जाहिरात
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / IPL 2022 : दिल्ली कॅपिटल्सला मिळाला नवा कोच, मुंबईच्या दिग्गजची टीममध्ये एन्ट्री

IPL 2022 : दिल्ली कॅपिटल्सला मिळाला नवा कोच, मुंबईच्या दिग्गजची टीममध्ये एन्ट्री

IPL 2022 : दिल्ली कॅपिटल्सला मिळाला नवा कोच, मुंबईच्या दिग्गजची टीममध्ये एन्ट्री

आयपीएल मेगा ऑक्शननंतर (IPL Auction 2022) सर्व टीमची नव्यानं रचना झाली आहे. नवे खेळाडू टीममध्ये दाखल झाल्यानंतर आता कोचिंग स्टाफमध्येही बदल होत आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 23 फेब्रुवारी : आयपीएल मेगा ऑक्शननंतर (IPL Auction 2022) सर्व टीमची नव्यानं रचना झाली आहे. नवे खेळाडू टीममध्ये दाखल झाल्यानंतर आता कोचिंग स्टाफमध्येही बदल होत आहे. दिल्ली कॅपिटल्सचा असिस्टंट कोच म्हणून मुंबई आणि टीम इंडियाचा माजी फास्ट बॉलर अजित आगरकरची (Ajit Agarkar) नियुक्ती झाली आहे. ऑस्ट्रेलियाचा माजी कॅप्टन रिकी पॉन्टिंग (Ricky Ponting) या टीमचा हेड कोच आहे. प्रवीण आम्रे बॅटींग कोच आणि जेम्स होप्स बॉलिंग कोच आहेत. आगरकरची कोच म्हणून नियुक्ती झाल्यानं टीम इंडियाचे माजी खेळाडू मोहम्मद कैफ आणि अजय रात्रा यांचा दिल्लीसोबतच्या कराराला मुदतवाढ मिळणार नाही, हे स्पष्ट झालं आहे. हे दोघंही टीमचे असिस्टंट कोच होते. कैफ 2019 पासून टीमसोबत होता. तर रात्राची मागील वर्षी नियुक्ती करण्यात आली होती. ‘इएसपीएन क्रिकइन्फो’ नं दिलेल्या वृत्तानुसार आगरकर सध्या ‘स्टार स्पोर्ट्स’ च्या ब्रॉडकास्टिंग टीमचा सदस्य आहे. तो भारत विरूद्ध श्रीलंका (India vs Sri Lanka) सीरिजनंतर तो दिल्लीच्या टीममध्ये दाखल होऊ शकतो. 3 टी20 आणि 2 टेस्टची ही सीरिज 16 मार्च रोजी समाप्त होईल. IND vs SL : टीम इंडियाला मोठा धक्का, 2 मॅच विनर खेळाडू सीरिजमधून आऊट पहिल्यांदाच कोच 44 वर्षांचा अजित आगरकर पहिल्यांदाच एखाद्या टीमचा कोच झाला आहे. तो 2007 साली शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता. त्याने 2013 साली क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. आगरकरनं निवृत्तीपूर्वी वन-डे क्रिकेटमध्ये 288 तर टेस्टमध्ये 58 विकेट्स मिळवल्या आहेत. मुंबईच्या अनेक रणजी विजेतेपदामध्येही आगरकरचा मोठा वाटा होता. अजित आगरकर 2011 ते 13 या कालावधीमध्ये दिल्ली डेयरडेव्हिल्स (DD) टीमचा  सदस्य होता. त्यापूर्वी 2008 ते 2010 या कालावधीमध्ये तो कोलकाता नाईट रायडर्स (KKR) टीमकडूनही खेळला. त्याने 62 टी20 मॅचमध्ये 47 विकेट्स घेतल्या आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात