Home /News /sport /

IPL 2022 : अंपायरच्या निर्णयावर प्रेक्षक संतापले, वानखेडेवर चीटर-चीटरची घोषणाबाजी! Viral Video

IPL 2022 : अंपायरच्या निर्णयावर प्रेक्षक संतापले, वानखेडेवर चीटर-चीटरची घोषणाबाजी! Viral Video

आयपीएल 2022 मध्ये शुक्रवारी झालेल्या दिल्ली कॅपिटल्स विरूद्ध राजस्थान रॉयल्स (Delhi Capitals vs Rajasthan Royals) या मॅचमधील मैदानात झालेल्या वादाचे पडसाद स्टेडिअमध्ये उपस्थित असलेल्या प्रेक्षकांमध्येही उमटले.

    मुंबई, 23 एप्रिल :  आयपीएल 2022 मध्ये शुक्रवारी झालेल्या दिल्ली कॅपिटल्स विरूद्ध राजस्थान रॉयल्स (Delhi Capitals vs Rajasthan Royals) या मॅचमधील मैदानात झालेल्या वादाचे पडसाद स्टेडिअमध्ये उपस्थित असलेल्या प्रेक्षकांमध्येही उमटले. संतप्त  प्रेक्षकांनी अंपायर नितिन मेनन (Nitin Menon) यांच्या विरोधात घोषणाबाजी केली. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. राजस्थान रॉयल्सनं पहिल्यांदा बॅटींग करत 222 रन केले होते. दिल्लीला शेवटच्या ओव्हर्समध्ये जिंकण्यासाठी 36 रनची गरज होती. रोव्हमन पॉवेलनं ओबेड मेकॉयच्या पहिल्या दोन बॉलवर सिक्स लगावात मॅचमध्ये रंगत वाढवली. त्यानं तिसऱ्या बॉलवरही सिक्स लगावाला आणि वाद सुरू झाला. मकॉयनं टाकलेला बॉल हा नो बॉल असल्याचं डगआऊटमध्ये बसलेल्या संपूर्ण दिल्ली टीमचं मत होतं. त्यांनी नो बॉलचा निर्णय थर्ड अंपायरकडे देण्याची मागणी केली. मैदानातील अंपायर त्यांच्या निर्णयावर ठाम होते. त्यामुळे वाद आणखी चिघळला. अंपायरच्या निर्णयावर दिल्ली कॅपिटल्सची टीम चांगलीच संतप्त झाली होती. त्यांना वानखेडेवर उपस्थित प्रेक्षकांनी देखील साथ दिली. प्रेक्षकांनी अंपायरच्या विरोधात चीटर-चीटरची घोषणाबाजी केली. KKR vs GT Dream 11 Team Prediction : 'हे' खेळाडू करतील तुम्हाला मालामाल! जोस बटलरचे शतक आणि देवदत्त पडिकलचं अर्धशतक याच्या जोरावर  राजस्थान रॉयल्सने निर्धारित 20 ओव्हर्समध्ये 222 रन केले. त्याला उत्तर देताना दिल्लीची टीम  टीम  8 आऊट 207 रनच करू शकली.राजस्थानने 7 सामन्यांमध्ये 5 वा विजय नोंदवले असून त्याचे 10 पॉईंट्स झाले आहेत. संजू सॅमसनच्या नेतृत्वाखालील ही टीम आता पॉईंट टेबलमध्ये  अव्वल स्थानावर पोहोचली आहे. त्याचवेळी दिल्लीला तितक्याच सामन्यांत चौथ्या पराभवाला सामोरे जावे लागले. दिल्ली 6 पॉईंट्ससह सहाव्या स्थानावर आहे.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Delhi capitals, Ipl 2022, Rajasthan Royals

    पुढील बातम्या