मुंबई, 18 एप्रिल : आयपीएल 2022 स्पर्धा रंगात आलेली असतानाच स्पर्धेत कोरोनाचा शिरकाव झाला आहे. काही दिवसांपूर्वी दिल्ला कॅपिटल्सचे फिजियो पॅट्रिक फारहार्ट (Patrick Farhart) यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर टीममधील आणखी एका खेळाडूला कोरोनाची लागण झाल्याचं वृत्त आहे. खेळाडूला कोरोना झाल्यानं दिल्ली कॅपिटल्सच्या मॅनेजमेंटनं नियोजित वेळापत्रकानुसार पुण्याला जाण्याचा निर्णय टाळला आहे.
दिल्ली कॅपिटल्सची पुढील मॅच बुधवारी (20 एप्रिल) रोजी पंजाब किंग्ज (Punjab Kings) विरूद्ध पुण्यात होणार आहे. दिल्लीची संपूर्ण टीम सध्या खबरदारीचा उपाय म्हणून क्वारंटाईन झाली आहे. त्यामुळे पुण्यात बुधवारी दिल्लीची मॅच होणार का? हा प्रश्न निर्माण झालाय. आयपीएल स्पर्धेवर गेल्या दोन वर्षांपासून कोरोनाचं सावट आहे. त्यामुळे यंदा स्पर्धा सुरू होण्यापूर्वीच याबाबत खास नियम बनवण्यात आले आहेत.
काय आहे नियम?
नवीन नियमानुसार, मॅच सुरू होण्याआधीच एखाद्या टीममध्ये कुणाला कोरोनाची लागण झाली आणि ती टीम 12 खेळाडू उभे करू शकली नाही तर काही गोष्टी बदलू शकतात.मॅचआधी प्रत्येक टीमला 12 खेळाडूंची नावं जाहीर करणं बंधनकारक असतं. यामध्ये 11 खेळाडू हे प्रत्यक्ष मैदानावर खेळणारे तर एक जण बदली असतो. यामध्ये 7 खेळाडू भारतीय असणं आवश्यक असतं. हे सगळे म्हणजे 12 खेळाडू उपलब्ध झाले नाहीत, तर मॅचची तारीख बदलली जाऊ शकते. कोरोनामुळे एखादी टीम प्लेइंग इलेव्हन बनवू शकली नाही, तर सामन्याचं वेळापत्रक (timetable) बदललं जाईल. त्यानंतरही सामना होऊ शकला नाही, तर हे प्रकरण तांत्रिक समितीकडे पाठवलं जाईल.
टेबल टेनिस विश्वाला खूप मोठा धक्का, 18 वर्षांच्या भारतीय खेळाडूचा दुर्दैवी मृत्यू!
बीसीसीआयच्या नियमानुसार, एखाद्या टीममध्ये प्लेइंग इलेव्हन (Playing 11) खेळाडू नसतील, तर तो सामना नंतर होईल आणि त्यानंतरही तो झाला नाही तर तांत्रिक समिती जो निर्णय घेईल तो सर्वांना मान्य करावा लागेल.यापूर्वी अशी परिस्थिती निर्माण झाली तर दोन्ही टीम्सना दोन-दोन पॉइंट्स दिले जात होते; पण आता कोरोनामुळे हा नवीन नियम बनविण्यात आला आहे
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Coronavirus, Covid19, Delhi capitals, Ipl 2022