मुंबई, 21 एप्रिल : पंजाब किंग्ज (Punjab Kings) विरूद्धच्या मॅचपूर्वी दिल्ली कॅपिटल्सच्या (Delhi Capitals) टीममध्ये काळजीचं वातावरण होतं. दिल्लीच्या सहा सदस्यांना कोरोनाची लागण झाल्याचं मॅचपूर्वी उघड झालं. मॅच सुरू होण्याच्या काही तास आधी न्यूझीलंडचा विकेट कीपर टीम सायफर्ट (Tim Siefert) पॉझिटिव्ह असल्याचं समोर आलं, याआधी ऑस्ट्रेलियाचा ऑलराऊंडर मिचेल मार्श (Mitchell Marsh) याचीही कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली, ज्यामुळे त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्यामुळे ही मॅच होणार की नाही? यावर प्रश्न निर्माण झालं होतं. या विपरित परिस्थितीमध्येही दोन्ही टीम मॅच खेळण्यावर ठाम होत्या.
दिल्लीच्या कॅम्पमध्ये कोरोनामुळे भीतीचं वातावरण होतं, असा खुलासा कॅप्टन ऋषभ पंतनं (Rishabh Pant) केला आहे. मॅच संपल्यानंतर बोलताना पंत म्हणाला की, 'या मॅचबद्दल बराच संभ्रम होता. टीममधील खेळाडूंना मॅचपूर्वी टीम सायफर्ट कोरोना पॉझिटिव्ह झाल्याचं समजलं. त्यामुळे आम्ही थोडं घाबरलो होतो. मॅच रद्द होणार अशी चर्चा सुरू होती. पण, आम्ही एक टीम म्हणून मॅचवर फोकस कायम ठेवला होता.'
पंजाबच्या विजयानंतर पंतनं त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर डेव्हिड वॉर्नर सोबत एक फोटो शेअर केला आहे. 'गेली काही दिवस टीमसाठी त्रासदायक होते. त्यानंतरही खेळाडूंनी या मॅचमध्ये प्रभावी कामगिरी केली.' असं कॅप्शन पंतनं या फोटोला दिलं आहे.
या सामन्यात ऋषभ पंतने टॉस जिंकून पहिले बॉलिंगचा निर्णय घेतला, यानंतर दिल्लीच्या बॉलर्सनी पंजाबला 20 ओव्हरमध्ये 115 रनवर ऑल आऊट केलं. दिल्लीकडून खलील अहमद, ललित यादव, अक्षर पटेल आणि कुलदीप यादव यांना प्रत्येकी 2-2 विकेट मिळाल्या, तर मुस्तफिजूर रहमानला एक विकेट घेण्यात यश आलं.
IPL 2022 : पंजाब किंग्जची डोकेदुखी वाढली, 9 कोटींचा खेळाडू ठरतोय सतत फ्लॉप
दिल्लीने 6 पैकी 3 मॅच जिंकल्या असून 3 मॅचमध्ये त्यांचा पराभव झाला. आता दिल्लीची पुढील मॅच शुक्रवारी राजस्थान रॉयल्स विरूद्ध होणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ही मॅच पुण्यात न खेळवता मुंबईतील वानखेडे स्टेडिअमवर खेळवण्यात येणार आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Covid19, Delhi capitals, Ipl 2022, Punjab kings, Rishabh pant