जाहिरात
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / IND vs SL : बुमराहपुढे श्रीलंकेचे लोटांगण, गावसकरांनी सांगितलं यशाचं रहस्य

IND vs SL : बुमराहपुढे श्रीलंकेचे लोटांगण, गावसकरांनी सांगितलं यशाचं रहस्य

IND vs SL : बुमराहपुढे श्रीलंकेचे लोटांगण, गावसकरांनी सांगितलं यशाचं रहस्य

महान क्रिकेटपटू सुनील गावसकर (Sunil Gavaskar) यांनी बुमराहच्या (Jasprit Bumrah) बॉलिंगची जोरदार प्रशंसा केली आहे. त्याचबरोबर त्याच्या यशाचं रहस्य देखील सांगितलं.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 14 मार्च : भारत विरूद्ध श्रीलंका (India vs Sri Lanka) यांच्यात बँगलोरमध्ये सुरू असलेल्या पिंक बॉल टेस्टमध्ये भारतीय बॉलर्सनं वर्चस्व गाजवले आहे. बॉलर्सच्या भेदक माऱ्यापुढे श्रीलंकेची पहिली इनिंग 109 रनववरच संपुष्टात आली. जसप्रीत बुमराहनं (Jasprit Bumrah) पहिल्या इनिंगमध्ये 5 विकेट्स घेतल्या. भारतामध्ये त्यानं पहिल्यांदाच एका इनिंगमध्ये 5 विकेट्स घेण्याची कामगिरी केली आहे. महान क्रिकेटपटू सुनील गावसकर (Sunil Gavaskar) यांनी बुमराहच्या बॉलिंगची जोरदार प्रशंसा केली आहे. त्याचबरोबर त्याच्या यशाचं रहस्य देखील सांगितलं. ‘स्टार स्पोर्ट्स’ वरील कार्यक्रमात बोलताना गावसकर म्हणाले की,  ‘कौशल्य, क्षमता आणि स्वत:वरील विश्वास हा नेहमीच फायदेशीर ठरतो. त्यामुळेच तो इतका यशस्वी आहे. तो प्रत्येक मॅचमध्ये अधिक चांगला होत आहे. प्रत्येक क्रिकेटपटूच्या कारकिर्दीमध्ये खराब कालखंड येतो. पण, बुमराह हा असा बॉलर आहे की ज्याचा सामना करायला प्रतिस्पर्धी टीमच्या बॅटर्सना आवडत नाही. बुमराहकडे कौशल्य आहे. तसंच बॉलिंहमध्ये विविधता आहे. त्यामुळे कोणत्याही बॅटरला त्याला खेळणे सोपे नाही. नव्या बॉलनं विकेट घेणे सोपे आहे. नवा बॉल हवेच स्विंग होतो. पिचवर पडल्यानंतर दिशा बदलतो. पण एखाद्या सेट बॅटरला आऊट केल्यानंतर तो बॉलर किती चांगला आहे, हे समजतं. तो चांगला बॉलर म्हणजे जसप्रीत बुमराह आहे.’ असे गावसकर यावेळी म्हणाले. Ranji : जावेद मियादांदचा 47 वर्ष जुना रेकॉर्ड मोडणारा कुशाग्र कोण आहे? पुस्तकांशी खास कनेक्शन दुसऱ्या दिवसाच्या सुरूवातीला श्रीलंकेची पहिली इनिंग फक्त 109 रनवर ऑल आऊट झाली, त्यामुळे भारताला 143 रनची मोठी आघाडी मिळाली. जसप्रीत बुमराहने सर्वाधिक 5 विकेट घेतल्या, तर अश्विन आणि शमीला प्रत्येकी 2-2 आणि अक्षर पटेलला 1 विकेट मिळाली. त्यानंतर श्रीलंकेच्या दुसऱ्या इनिंगमध्येही बुमराहनं दमदार सुरूवात केली.  बुमराहने इनिंगच्या तिसऱ्याच बॉलला लहिरु थिरमानेला शून्य रनवर आऊट केलं. श्रीलंकेला विजयासाठी आणखी 419 रनची गरज आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात