मुंबई, 5 जुलै: क्रिकेट फॅन्ससाठी मोठी बातमी आहे. पुढील वर्षी होणाऱ्या आयपीएल स्पर्धेसाठी (IPL 2022) सर्व योजना (blueprint) बीसीसीआयनं (BCCI) तयार केली आहे. पुढच्या वर्षी दोन नव्या टीमचा आयपीएलमध्ये समावेश होणार आहे, तसंच सर्व खेळाडूंचा लिलाव (Mega Auction) होणार असल्याची घोषणा बीसीसीआयनं यापूर्वीच केली होती. त्यामुळे आयपीएलमध्ये खेळणाऱ्या टीमची संख्या 10 होणार आहे. टीम वाढल्यानं खेळाडू देखील अधिक खेळतील. त्याचबरोबर मेगा ऑक्शनमुळे सध्या असलेल्या सर्व टीमचं स्वरुप बदलणार आहे. त्यामुळे आगामी आयपीएलबाबत क्रिकेट फॅन्समध्ये मोठी उत्सुकता आहे. कोणते उद्योगसमुह रिंगणात? ‘टाईम्स ऑफ इंडिया’ ने दिलेल्या वृत्तानुसार बीसीसीआय दोन नव्या टीमबाबत येत्या ऑगस्ट महिन्यात टेंडर काढेल. ऑक्टोबरमध्ये या टीमची घोषणा होईल. कोलकातामधील संजीव गोयंका ग्रृप, अदानी ग्रुप अहमदाबाद, ऑरबिंदो फार्मा लिमिटेड हैदराबाद आणि टोरेंट ग्रुप गुजरात या प्रमुख उद्योग समुहाने नवी टीम खरेदी करण्यासाठी उत्सुकता दाखवली आहे. कधी होणार ऑक्शन? बीसीसीआय पुढील वर्ष सर्व आयपीएल फ्रँचायझींची पर्स देखील वाढवण्याच्या विचारात आहे. सध्या ही याची कमाल मर्यादा 85 कोटी आहे ती पुढील वर्षी 90 कोटी केली जाईल. 2024 पर्यंत पर्स 100 कोटींपर्यंत वाढेल. यामधील किमान 75 टक्के रक्कम खर्च करणे सर्व फ्रंचायझींना बंधनकारक असेल. मेगा ऑक्शन डिसेंबर महिन्यात होण्याची शक्यता आहे. रिटेन नियमात बदल बीसीसीआय यंदा खेळाडू रिटेन करण्याच्या नियमातही बदल करणार आहे. सर्व फ्रँचायझींना जास्तीत जास्त 4 खेळाडू रिटेन करण्याची परवानगी मिळेल. यामध्ये त्यांना 3 भारतीय आणि 1 विदेशी किंवा 2 भारतीय आणि 2 विदेशी खेळाडूंना रिटेन करण्याची परवानगी मिळेल. ‘माझ्या बेडरूमध्येही त्याचा शिरकाव, माही झोपेतही त्याचाच करतो विचार,’ साक्षीचा खुलासा! पाहा VIDEO तीन खेळाडू रिटेन केल्यास फ्रँचायझींना त्यांना अनुक्रमे 15, 11 आणि 7 कोटी रुपये द्यावे लागतील. दोन खेळाडू रिटेन केले तर 12.5 आणि 8.5 कोटी त्यांच्या पर्समधून कमी होतील. तर एक खेळाडू रिटेन केल्यास त्याच्यासाठी 12.5 कोटी द्यावे लागतील. याचबरोबर बीसीसीआय आयपीएल स्पर्धेच्या मीडिया राईट्सची देखील तयारी करत आहे. त्याचे टेंडर पुढील वर्षी जानेवारी महिन्यात काढण्यात येणार आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

)







