मुंबई, 9 एप्रिल : आयपीएल स्पर्धेच्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या टॉप 5 बॉलर्सपैकी एक असलेल्या अमित मिश्राला (Amit Mishra) यंदाच्या ऑक्शनमध्ये कोणत्याही टीमनं खरेदी केलं नाही. मिश्रा त्यानंतरही आयपीएल स्पर्धेवर लक्ष ठेवून असून त्याबाबत सातत्यानं सोशल मीडियावर प्रतिक्रिया देत असतो. मिश्रानं क्रिकेट फॅनच्या प्रतिक्रियेला उत्तर देताना चार वेळा ही स्पर्धा जिंकणाऱ्या चेन्नई सुपर किंग्सला (Chennai Super Kings) ट्रोल केलं आहे. ‘सर, चेन्नई सुपर किंग्समध्ये या’ अशी विनंती एका फॅननं मिश्राला ट्विटरवर केली होती. त्यावर 39 वर्षांच्या मिश्रानं ‘माफ कर मित्रा..अजून दोन वर्ष लहान आहे,’ असं उत्तर दिलं आहे. मिश्राचं हे उत्तर सोशल मीडियावर चांगलंच व्हायरल झालं आहे.
Sorry mate, Still two years younger for it. https://t.co/9rCi5SFIz8
— Amit Mishra (@MishiAmit) April 8, 2022
चेन्नई सुपर किंग्सची टीम आयपीएलमध्ये ‘डॅड आर्मी’ म्हणून ओळखली जाते. या टीममधील बहुतेक खेळाडू हे 30 वर्षांपेक्षा जास्त वयाचे आहेत. यंदाच्या सिझनमध्येही महेंद्रसिंह धोनी, रविंद्र जडेजा, रॉबिन उथप्पा, मोईन अली, ड्वेन ब्राव्हो, अंबाती रायुडू, डेवॉन कॉन्वे, ख्रिस जॉर्डन, ड्वेन प्रिटोरीयस हे खेळाडू 30 वर्षांपेक्षा जास्त वयाचे आहेत. IPL 2022, SRH vs CSK : चेन्नईच्या टीममध्ये होणार बदल ‘मराठवाडा एक्स्प्रेस’ला मिळणार संधी आयपीएलमध्ये सर्वात जास्त विकेट्स घेणाऱ्या खेळाडूंच्या यादीमध्ये अमित मिश्रा तिसऱ्या क्रमांकावर आहे. त्यानं या स्पर्धेत हॅट्ट्रिकही घेतली आहे. मागील सिझनमध्ये मिश्रा दिल्ली कॅपिटल्स टीमचा सदस्य होता. त्यानं 154 आयपीएल मॅचमध्ये 7.35 च्या इकोनॉमी रेटनं 166 विकेट्स घेतल्या आहेत.