मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /IPL 2021 : लिलावानंतर दोन मिनिटांनी ‘या’ खेळाडूला आला विराटचा इमोशनल मेसेज

IPL 2021 : लिलावानंतर दोन मिनिटांनी ‘या’ खेळाडूला आला विराटचा इमोशनल मेसेज

आरसीबीनं अझहरुद्दीनची निवड केल्यानंतर दोन मिनिटांनी त्याला एका अनोळखी नंबरहून मेसेज आला. ज्यामध्ये त्याचं आरसीबीमध्ये निवड झाल्याबद्दल अभिनंदन करण्यात आलं होतं.

आरसीबीनं अझहरुद्दीनची निवड केल्यानंतर दोन मिनिटांनी त्याला एका अनोळखी नंबरहून मेसेज आला. ज्यामध्ये त्याचं आरसीबीमध्ये निवड झाल्याबद्दल अभिनंदन करण्यात आलं होतं.

आरसीबीनं अझहरुद्दीनची निवड केल्यानंतर दोन मिनिटांनी त्याला एका अनोळखी नंबरहून मेसेज आला. ज्यामध्ये त्याचं आरसीबीमध्ये निवड झाल्याबद्दल अभिनंदन करण्यात आलं होतं.

मुंबई, 22 फेब्रुवारी : सध्याच्या काळात प्रत्येक क्रिकेटपटूचा भारताचा कॅप्टन विराट कोहली (Virat Kohli) रोल मॉडेल आहे. विराटसोबत क्रिकेट खेळण्याची प्रत्येकाची इच्छा असते. पण, खूप कमी खेळाडूंना ही संधी मिळते. ज्या मोजक्या खेळाडूंना ही संधी मिळते त्यांच्यासाठी ही एक प्रकारे स्वप्नपूर्ती असते. केरळचा विकेटकिपर-बॅट्समन मोहम्मद अझहरुद्दीनची (Mohammed Azharudeen) ही स्वप्नपूर्ती झाली आहे.

मोहम्मद अझहरुद्दीनने बंगळुरुतील एका हॉटेलमध्ये बसून पाच दिवसांपूर्वी झालेला आयपीएल लिलावाचा (IPL Auction) कार्यक्रम पाहिला. त्यावेळी अझहरुद्दीनला रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुनं (RCB) 20 लाख रुपयांना खरेदी केलं. आरसीबीनं अझहरुद्दीनची निवड केल्यानंतर दोन मिनिटांनी त्याला एका अनोळखी नंबरहून मेसेज आला. ज्यामध्ये त्याचं आरसीबीमध्ये निवड झाल्याबद्दल अभिनंदन करण्यात आलं होतं.

‘विराट माझा रोल मॉडेल’

अझहरुद्दीननं ‘स्पोर्ट्स क्रीडा’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये हा प्रसंग सांगितला आहे. ‘लिलावानंतर दोन मिनिटांनी मला विराटभाईचा मेसेज आला. त्यामध्ये लिहलं होतं, वेलकम टू आरसीबी, ऑल द बेस्ट, विराट हेयर’ हा मेसेज पाहून मी भावुक झालो होतो. तो मला मेसेज करेल असा मी कधीही विचार केला नव्हता. विराट माझ्यासाठी क्रिकेट आयकॉन आहे. त्याच्यासोबत क्रिकेट खेळण्याचं माझं स्वप्न आहे. विराटच्या टीमचा सदस्य झाल्यामुळे मी खूप उत्साही आणि आनंदात आहे.’

मोहम्मद अजहरुद्दीनने 2015 पासून क्रिकेट खेळण्यास सुरुवात केली. यष्टीरक्षक आणि फलंदाज म्हणून त्याने आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली. आतापर्यंत टी 20 च्या करिअरमध्ये 24 सामन्यात त्याने 451 रन्स केले आहे. यात एका शतकाचा समावेश आहे. नुकत्याच झालेल्या सय्यद मुश्ताक अली टी-20 स्पर्धेत त्यानं अवघ्या 37 चेंडूमध्ये शतक झळकावले होते.

( वाचा : टीम इंडियातून वगळताच पृथ्वी शॉची बॅट तळपली, मुंबईनं दिल्लीचा केला दणदणीत पराभव )

26 वर्षीय अजहरुद्दीनचा प्रवास हा संघर्षमय राहिला आहे. अजहरुद्दीनला 8 भाऊ आहे असून तो सर्वात लहान आहे. क्रिकेटबद्दल लहानपणापासून अजहरुद्दीनला आवड होती. त्यामुळे त्याने क्रिकेटमध्ये करिअर करण्यासाठी मार्ग निवडला.

First published:

Tags: Cricket news, IPL 2021, Ipl 2021 auction, RCB, Sports, Virat kohli