• Home
 • »
 • News
 • »
 • sport
 • »
 • IPL 2021: 2 वेळा सलग 6 सिक्स, 40 ओव्हरमध्ये 200 रन करणारा 'हा' आहे पंतचा नवा साथीदार

IPL 2021: 2 वेळा सलग 6 सिक्स, 40 ओव्हरमध्ये 200 रन करणारा 'हा' आहे पंतचा नवा साथीदार

दिल्ली कॅपिटल्सनं (Delhi Capital) गुरुवारच्या मॅचमध्ये ऑलराऊंडर ललित यादवला (Lalit Yadav) पहिल्यांदा संधी दिली. मागील संपूर्ण सिझन ललित बेंचवर होता.

 • Share this:
  मुंबई, 15 एप्रिल : दिल्ली कॅपिटल्सनं (Delhi Capital)  गुरुवारच्या मॅचमध्ये ऑलराऊंडर ललित यादवला (Lalit Yadav) पहिल्यांदा संधी दिली. मागील संपूर्ण सिझन ललित बेंचवर होता. त्याला अखेर या सिझनमध्ये संधी मिळाली. देशातील नव्या दमाच्या आक्रमक खेळाडू अशी यादवची ओळख आहे. दिल्लीनं या ऑलराऊंडरला 20 लाखांच्या बेस प्राईजमध्ये खरेदी केलं. बॅट आणि बॉल दोन्हीमध्ये चांगली कामगिरी करण्याची त्याच्यात क्षमता आहे. उत्तर प्रदेशकडून खेळणाऱ्या ललित नुकत्याच झालेल्या विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत सहाव्या क्रमांकावर येऊन 61 रन काढले होते. ललित यादव मिडल ऑर्डरचा बॅट्समन आणि ऑफ स्पिनर आहे. मोठे शॉट्स मारणारा बॅट्समन अशी त्याची ओळख आहे. ललितनं 6 बॉलमध्ये 6 सिक्स लगावण्याचा पराक्रम दोनदा केला आहे. नजफगड स्पोर्ट्स कॉम्पलेक्समध्ये झालेल्या एका टी20 मॅचमध्ये त्यानं हा पराक्रम केला होता. त्या मॅचमध्ये फक्त 46 बॉलमध्ये 130 रन काढले होते. अंडर 14 गटातील 40 ओव्हर्सच्या मॅचमध्ये ललितनं द्विशतक झळकावलं होतं. नजफगडच्या राहणाऱ्या ललितचा वीरेंद्र सेहवाग हा आयडॉल आहे. ललितनं आजवर 12 फर्स्ट क्लासमध्ये 40.71 च्या सरासरीनं 570 रन काढले आहेत. यामध्ये 6 अर्धशतकांचा समावेश आहे. त्यानं A श्रेणीच्या 24 मॅचमध्ये 41.72 च्या सरासरीनं 459 रन काढले आहेत. तर 35 टी20 मॅचमध्ये 37.33 च्या सरासरीनं 560 रन काढले असून यामध्ये एका अर्धशतकाचा समावेश आहे. देशांतर्गत क्रिकेटमध्ये ललितनं बॉलिंगमध्ये कमाल केली आहे. त्यानं 12 फर्स्ट क्लासमध्ये 9 विकेट्स घेतल्या आहेत.  A श्रेणीच्या 24 मॅचमध्ये त्याच्या नावावर 29 विकेट्स असून 35 टी20 मॅचमध्ये त्यानं 27 विकेट्स घेतल्या आहेत. यामध्ये त्याचा इकॉनॉमी रेट हा फक्त 6.86 आहे. नव्या कॅप्टनची कमाल, राजस्थान रॉयल्सनं सुधारली सर्वात मोठी चूक! पंतचा साथीदार ललित यादवनं पहिल्याच मॅचमध्ये दिल्ली कॅपिटल्सचा कॅप्टन ऋषभ पंत (Rishabh Pant) सोबत मोलाची पार्टरनरशिप केली. दिल्लीची अवस्था 4 आऊट 37 अशी बिकट असताना तो बॅटींगला आला. त्यानं पंतला खंबीर साथ देत त्याच्यासोबत 5 व्या  विकेटसाठी 51 रनची पार्टरनरशिप केली. ललित यादव पहिल्या मॅचमध्ये 20 रन काढून आऊट झाला. ख्रिस मॉरीसच्या बॉलिंगवर राहुल तेवतियानं त्याचा जबरदस्त कॅच घेतला.
  Published by:News18 Desk
  First published: