मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

IPL 2021: 'त्याला पैसा मिळाला पण...' ख्रिस मॉरीसबद्दलचं सेहवागचं Tweet Viral

IPL 2021: 'त्याला पैसा मिळाला पण...' ख्रिस मॉरीसबद्दलचं सेहवागचं Tweet Viral

टीम इंडियाचा माजी क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवाग (Virender Sehwag) सोशल मीडियावर हटके पोस्ट आणि कमेंट्ससाठी ओळखला जातो. राजस्थान रॉयल्स विरुद्ध  दिल्ली कॅपिटल्स (RR vs DC) या मॅचनंतरही सेहवागनं एक हटके ट्विट केलं आहे

  • Published by:  News18 Desk

मुंबई, 15 एप्रिल : टीम इंडियाचा माजी क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवाग (Virender Sehwag) सोशल मीडियावर हटके पोस्ट आणि कमेंट्ससाठी ओळखला जातो. राजस्थान रॉयल्स विरुद्ध  दिल्ली कॅपिटल्स (RR vs DC) या मॅचनंतरही सेहवागनं एक हटके ट्विट केलं आहे. जे आता व्हायरल (Viral) झालं आहे. सेहवागनं राजस्थान रॉयल्सच्या विजयाचा हिरो ख्रिस मॉरीसवर (Chris Morris) प्रतिक्रिया दिली आहे.

सेहवागनं मॉरीसच्या नाबाद 36 रनच्या खेळीवर लिहलं आहे. "पहिली मॅच - पैसा मिळाला, प्रतिष्ठा नाही. दुसरी मॅच - याला म्हणतात प्रतिष्ठा. प्रतिष्ठा आणि पैसा. कमाल केलीस मॉरीस"

आयपीएल लिलावात सर्वात महाग ठरलेल्या ख्रिस मॉरीसनं निर्णायक क्षणी 'पैसा वसूल' खेळ करत राजस्थान रॉयल्सला विजय मिळवून दिला आहे. राजस्थानला 2 ओव्हरमध्ये 27 रन हवे होते. त्यावेळी मॉरीसनं कागिसो रबाडाच्या एकाच ओव्हरमध्ये 15 रन काढले. त्यानंतर त्यानं शेवटच्या ओव्हरमध्ये आवश्यक असलेले 12 रन फक्त 4 बॉलमध्ये पूर्ण केले.  मॉरिसनं फक्त 18 बॉलमध्ये 36 रनची खेळी करत राजस्थान रॉयल्सला 2 बॉल आणि 3 विकेट्स राखून विजय मिळवून दिला.

यापूर्वी पंजाब किंग्ज विरुद्ध झालेल्या मॅचमध्ये  राजस्थानला शेवटच्या दोन बॉलवर विजयासाठी 5 रनची गरज होती, तेव्हा त्यांचा कर्णधार संजू सॅमसन (Sanju Samson) आणि ख्रिस मॉरिस मैदानात होते, पण संजू सॅमसननं मॉरिसला स्ट्राईक दिला नाही, त्यामुळे राजस्थानला शेवटच्या बॉलवर 5 रन आवश्यक होते, तेव्हा अर्शदीपच्या बॉलिंगवर सॅमसनने सिक्स मारण्याचा प्रयत्न केला, पण बाऊंड्री लाईनवर दीपक हुडाने त्याचा कॅच पकडला आणि राजस्थानला सामना गमवावा लागला.

(वाचा: मॉरीसच्या फटकेबाजीनंतर 'त्या' निर्णयावर काय वाटतं?, संजू सॅमसननं दिलं उत्तर )

ख्रिस मॉरिसला राजस्थानने 16.25 कोटी रुपयांची बोली लावून लिलावात (IPL Auction 2021) विकत घेतलं. याचसोबत आयपीएल इतिहासात सर्वाधिक रक्कम मिळवणाच्या इतिहास मॉरिसच्या नावावर झाला. लिलावात एवढे पैसे देऊन बोली लावलेल्या मॉरिसवर राजस्थानच्या कर्णधाराचाच विश्वास नाही का? असा प्रश्न सॅमसनने त्याला स्ट्राईक न दिल्यामुळे विचारला जात होता.

First published:

Tags: Chris morris, Delhi capitals, IPL 2021, Rajasthan Royals, Virender sehwag