जाहिरात
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / IPL 2021: IPL 2021: मॉरीसच्या फटकेबाजीनंतर 'त्या' निर्णयावर काय वाटतं?, संजू सॅमसननं दिलं उत्तर

IPL 2021: IPL 2021: मॉरीसच्या फटकेबाजीनंतर 'त्या' निर्णयावर काय वाटतं?, संजू सॅमसननं दिलं उत्तर

IPL 2021: IPL 2021: मॉरीसच्या फटकेबाजीनंतर 'त्या' निर्णयावर काय वाटतं?, संजू सॅमसननं दिलं उत्तर

ख्रिस मॉरीसच्या (Chris Morris) फटकेबाजीनंतर राजस्थानचा कॅप्टन संजू सॅमसन (Sanju Samson) याला मॉरीसला स्ट्राईक न देण्याच्या निर्णयावर पून्हा एकदा प्रश्न विचारण्यात आला.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 16 एप्रिल : आयपीएल स्पर्धेतील सातव्या मॅचमध्ये राजस्थान रॉयल्सनं दिल्ली कॅपिटल्सचा 3 विकेट्सनं पराभव केला. दिल्ली कॅपिटल्सनं निर्धारित 20 ओव्हरमध्ये 7 आऊट 147 रन केले. राजस्थान रॉयल्सनं हे आव्हान ख्रिस मॉरीसच्या (Chris Morris) फटकेबाजीच्या जोरावर पूर्ण केलं. मॉरीसनं फक्त 18 बॉलमध्ये नाबाद 36 रन काढले. त्यामुळे राजस्थाननं ही मॅच 2 बॉल आणि 3 विकेट्स राखून जिंकली. मॉरीसनं या खेळीत चार सिक्स लगावत राजस्थानच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं. मॉरीसच्या या फटकेबाजीनंतर राजस्थानचा कॅप्टन संजू सॅमसन (Sanju Samson) याला मॉरीसला स्ट्राईक न देण्याच्या निर्णयावर पून्हा एकदा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर संजूनं महत्त्वाची प्रतिक्रिया दिली आहे. “पंजाब किंग्ज विरुद्धची मॅच 100 वेळा खेळली तरी मी ख्रिस मॉरिसला स्ट्राईक देणार नाही.” असे मॉरीसनं स्पष्ट केले.  सॅमसननं त्या मॅचमध्ये शतक झळकावलं होतं. तर मॉरीसला फटकेबाजी करणं अवघड जात होतं. त्यामुळे सॅमसननं कॅप्टन म्हणून टीमची जबाबदारी घेतली. मात्र तो विजय मिळवून देऊन शकला नाही. ड्रेसिंग रुममध्ये करत होता प्रार्थना दिल्लीविरुद्ध राजस्थानची अवस्था 5 आऊट 42 अशी नाजूक झाली होती. राजस्थानच्या विजयाचा मार्ग अवघड बनला होता. त्यावेळी असलेल्या मनस्थितीचं देखील संजूनं वर्णन केलं आहे. " प्रामाणिकपणे सांगायचं तर 5 विकेट्स गेल्यानंतर आता अवघड आहे, अशी माझी भावना झाली होती. आमच्याकडं मिलर आणि मॉरीस होते, तरीही मला वाटलं की हे अवघड आहे. मॉरीस तू आणखी एक सिक्स मार, अशी प्रार्थना मी करत होतो." असं सॅमसननं सांगितलं. सर्वात महागड्या ख्रिस मॉरीसचा ‘पैसा वसूल’ खेळ, राजस्थानचा पहिला विजय ख्रिस मॉरीसनं शेवटच्या 10 बॉलमध्ये 4 सिक्स लगावत दिल्लीच्या तोंडातून विजयाचा घास काढून घेतला. राजस्थान रॉयल्सचा हा स्पर्धेतील पहिलाच विजय आहे. आता त्यांची पुढील मॅच 19 एप्रिल रोजी चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध होणार आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात