Home /News /sport /

IPL 2021: विराट कोहलीच्या सल्ल्यानं बदलला राजस्थानच्या 'या' खेळाडूचा खेळ

IPL 2021: विराट कोहलीच्या सल्ल्यानं बदलला राजस्थानच्या 'या' खेळाडूचा खेळ

राजस्थान रॉयल्सच्या रियान परागनं (Riyan Parag) एका छोट्या खेळीच्या जोरावर सर्वांच मन जिंकलं आहे. टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहली (Virat Kohli) यानं दिलेला सल्ला मला उपयोगी ठरला, असं परागनं सांगितलं आहे.

    मुंबई,  16 एप्रिल: राजस्थान रॉयल्सचा (Rajasthan Royals) कॅप्टन संजू सॅमसन (Sanju Samson) याने आयपीएल 2021 (IPL 2021) मधील पहिल्याच मॅचमध्ये 119 रनची जबरदस्त खेळी केली. त्याच्या या झुंजार खेळीनंतरही राजस्थानची टीम पराभूत झाली. मात्र त्या मॅचमध्ये रियान पराग (Riyan Parag) याच्या छोट्यान खेळीनं सर्वांचं मन जिंकलं. राजस्थान रॉयल्सची अवस्था 4 आऊट 123 होती तेंव्हा 19 वर्षांचा पराग बॅटींगला आला होता. परागनं टीमच्या आवश्यकतेनुसार 11 बॉलमध्ये 25 रन काढले. यामध्ये एक फोर आणि तीन सिक्सचा समावेश होता. पंजाबचा अनुभवी फास्ट बॉलर मोहम्मद शमीनं त्याला आऊट केलं. असं असलं तरी 222 रनचा पाठलाग करताना रियान परागनं राजस्थानचा रनरेट कमी होणार नाही, याची खबरदारी घेतली. या मॅचनंतर रियान परागनं 'क्रिकबझ'शी बोलताना टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहलीचा (Virat Kohli) उल्लेख केला. "सहाव्या नंबरवर बॅटींग करत असल्यानं जास्त संधी मिळणार नाही असं वाटतं का?'' असा प्रश्न परागनं विराटला विचारला होता. त्यावर विराटनं दिलेल्या सल्ल्यानं आपला खेळ बदलल्याचं त्यानं सांगितलं. "विराट कोहलीनं मला मागच्या आयपीएल सिझनमध्ये सांगितलं होतं की तुला ऑरेंज कॅप तर घ्यायची नाही. तू पाचव्या किंव्या सहा क्रमांकावर बॅटींग कर. टीमला उपयोगी पडणारे 20-30 रन कसे करता येतील याचा विचार कर. तुला संधी मिळेल तेंव्हा टीमला संकटातून बाहेर काढण्याचा प्रयत्न कर" असा सल्ला विराटनं परागला दिला होता. पराग त्यानंतर पुढे म्हणाला की, "विराटचा सल्ला मला पटला आहे. मी आता खूप रन करण्याचा विचार करत नाही. टीमला किती रनची गरज आहे, याचाच विचार मी करतो." रियाननं आयपीएल 2021 मध्ये आजवर 2 मॅचमध्ये 27 रन काढले आहेत. यामध्ये त्याचा स्ट्राईक रेट 168.75 आहे. त्याचबरोबर परागनं 1 विकेटही घेतली आहे. विराटचा पगार किती आहे माहितेय का? पाकिस्तानच्या टीमला पुरेल इतकी कमाई आयपीएल 2020 मध्ये राजस्थानच्या या तरुण ऑल राऊंडरनं 12 मॅचमध्ये 12.28 च्या सरासरीनं आणि 111.68 च्या स्ट्राईक रेटनं 86 रन केले होते. तर 2019 च्या आयपीएलमध्ये परागनं 7 मॅचमध्ये 32 ची सरासरी आणि 126.98 च्या स्ट्राईक रेटनं 160 रन काढले होते. त्या सिझनमध्ये परागन 2 विकेट्सही घेतल्या होत्या.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Cricket news, IPL 2021, Rajasthan Royals, Sanju samson, Sports, Virat kohli

    पुढील बातम्या