जाहिरात
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / IPL 2021: उसेन बोल्टचा RCB ला खास संदेश! विराट, डीव्हिलिर्यसनं दिली 'ही' प्रतिक्रिया

IPL 2021: उसेन बोल्टचा RCB ला खास संदेश! विराट, डीव्हिलिर्यसनं दिली 'ही' प्रतिक्रिया

IPL 2021: उसेन बोल्टचा RCB ला खास संदेश! विराट, डीव्हिलिर्यसनं दिली 'ही' प्रतिक्रिया

वेगाचा बादशाह उसेन बोल्ट (Usain Bolt) यानं या आयपीएल स्पर्धेपूर्वी (IPL 2021) विराट कोहलीच्या (Virat Kohli) रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (Royal Challengers Bangalore) टीमला पाठिंबा दिला आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 8 एप्रिल: वेगाचा बादशाह उसेन बोल्ट (Usain Bolt) यानं या आयपीएल स्पर्धेपूर्वी (IPL 2021) विराट कोहलीच्या (Virat Kohli) रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (Royal Challengers Bangalore) टीमला पाठिंबा दिला आहे. आयपीएल स्पर्धेच्या 14 व्या सिझनची सुरुवात शुक्रवार 9 एप्रिल रोजी होणार आहे. या स्पर्धेची पहिली मॅच मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (MI vs RCB) यांच्यात होणार आहे. या मॅचच्या पूर्वी उसेन बोल्टनं आरसीबीच्या खेळाडूंसोबत मजेदार बँटर सुरु केलं आहे. उसेन बोल्टनं आरसीबीची जर्सी घालून त्याच्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन एक फोटो ट्विट केलं आहे. “चॅलेंजर्स, फक्त तुम्हाला सांगतो मी आजही सर्वात वेगवान आहे.” असं बोल्टनं म्हंटलं आहे. त्यानं या ट्विटमध्ये विराट कोहली आणि एबी डीव्हिलियर्स यांना टॅग केलं आहे. दक्षिण आफ्रिकेचा माजी क्रिकेटपटू आणि ‘मिस्टर 360’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या डीव्हिलियर्सनं बोल्टला उत्तर दिलं आहे. “आम्हाला अतिरिक्त रनची आवश्यकता असेल तर कुणाला कॉल करायचा हे माहिती आहे,” असं उत्तर डीव्हिलियर्सनं दिलं आहे. क्रिकेट फॅन्सला ही प्रतिक्रिया चांगलीच आवडली आहे.

null

आरसीबीचा कॅप्टन विराट कोहली यानंही बोल्टला उत्तर दिलं आहे. “कोणतीही शंका नाही. यामुळेच तू आमच्या टीममध्ये आहेस.” असं उत्तर विराटनं दिलं आहे.

null

( सतत फ्लॉप होऊनही Maxwell ला इतके पैसे का मिळतात? गंभीरनं सांगितलं कारण  ) विराट कोहलीच्या आरसीबीनं मागच्या आयपीएलमध्ये (IPL 2020) ‘प्ले ऑफ’ मध्ये प्रवेश केला होता. यावर्षी ही टीम विजेतेपदाचा दुष्काळ संपवेल अशी आशा फॅन्सना आहे. आरसीबीनं यावर्षी त्यांच्या टीममध्ये ग्लेन मॅक्सवे, डॅनियल ख्रिस्टीन, कायले जेमिसन या खेळाडूंचा समावेश केला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात