मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

IPL 2021, DC vs SRH : दिल्ली पुन्हा टॉपवर, हैदराबाद 'प्ले-ऑफ' मधून आऊट!

IPL 2021, DC vs SRH : दिल्ली पुन्हा टॉपवर, हैदराबाद 'प्ले-ऑफ' मधून आऊट!

IPL 2021 दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या सामन्यामध्ये हैदराबादचा (SRH vs DC) तब्बल 8 विकेटने दारूण पराभव झाला. या विजयासह दिल्लीची टीम पॉईंट्स टेबलमध्ये पहिल्या क्रमांकावर पोहोचली आहे, तर हैदराबादचं प्ले-ऑफला (IPL Play Off) पोहोचण्याचं स्वप्न जवळपास संपुष्टात आलं आहे.

पुढे वाचा ...
    दुबई, 22 सप्टेंबर : आयपीएलच्या यंदाच्या मोसमात (IPL 2021) सनरायजर्स हैदराबादची हाराकिरी सुरूच आहे. आयपीएल 2021 च्या दुसऱ्या राऊंडमध्येही हैदराबादचं नशीब बदललं नाही. दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या सामन्यामध्ये हैदराबादचा (SRH vs DC) तब्बल 8 विकेटने दारूण पराभव झाला. या विजयासह दिल्लीची टीम पॉईंट्स टेबलमध्ये पहिल्या क्रमांकावर पोहोचली आहे, तर हैदराबादचं प्ले-ऑफला (IPL Play Off) पोहोचण्याचं स्वप्न जवळपास संपुष्टात आलं आहे. हैदराबादने दिलेल्या 135 रनच्या आव्हानाचा पाठलाग दिल्लीने 17.5 ओव्हरमध्ये 2 विकेट गमावून केला. दुखापतीनंतर पुनरागमन करणारा श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) 47 रनवर नाबाद राहिला, तर कर्णधार ऋषभ पंतने (Rishabh Pant) नाबाद 35 रनची खेळी केली. टी-20 वर्ल्ड कपसाठी भारतीय टीममध्ये स्थान न मिळालेला शिखर धवन (Shikhar Dhawan) 42 रन करून आणि पृथ्वी शॉ (Prithvi Shaw) 11 रन करून पॅव्हेलियनमध्ये परतले. हैदराबादकडून खलील अहमदला 1 आणि राशिद खानला 1 विकेट घेण्यात यश आलं. या सामन्यात सनरायजर्स हैदराबादचा कर्णधार केन विलियमसन (Kane Williamson) याने टॉस जिंकून पहिले बॅटिंगचा निर्णय घेतला, पण दिल्लीच्या एनरिच नॉर्कियाने हैदराबादला पहिल्याच ओव्हरमध्ये धक्का दिला. नॉर्कियाने डेव्हिड वॉर्नरला (David Warner) शून्य रनवर आऊट केलं. एप्रिल 2016 नंतर वॉर्नर पहिल्यांदाच आयपीएलमध्ये शून्य रनवर आऊट झाला. यानंतर दिल्लीने वारंवार हैदराबादला धक्के दिले. 20 ओव्हरमध्ये त्यांना फक्त 134 रनपर्यंत मजल मारता आली. सहाव्या क्रमांकावर बॅटिंगला आलेल्या अब्दुल समदने सर्वाधिक 28 रन केले, तर आठव्या क्रमांकावरच्या राशिद खानने 22 रनची खेळी केली. दिल्लीकडून कागिसो रबाडाने सर्वाधिक 3 विकेट घेतल्या, तर अक्षर पटेल आणि एनरिक नॉर्कियाला प्रत्येकी 2-2 विकेट घेण्यात यश आलं. दिल्ली टॉपवर हैदराबादविरुद्धच्या या विजयानंतर दिल्ली कॅपिटल्स पॉईंट्स टेबलमध्ये (IPL Points Table) पहिल्या क्रमांकावर गेली आहे. दिल्लीने 9 पैकी 7 सामने जिंकले असून फक्त 2 मॅचमध्ये त्यांचा पराभव झाला. दिल्लीच्या खात्यात आता 14 पॉईंट्स आहेत, त्यामुळे त्यांचं प्ले-ऑफमधलं स्थान जवळपास निश्चित झालं आहे. उरलेल्या 5 पैकी दिल्लीला आता फक्त 1 मॅच जिंकायची आहे. हैदराबाद आऊट दुसरीकडे हैदरबादचं प्ले-ऑफला पोहोचण्याचं स्वप्न जवळपास संपुष्टात आलं आहे. हैदराबादची टीम पॉईंट्स टेबलमध्ये आठव्या म्हणजेच शेवटच्या क्रमांकावर आहे. हैदराबादने 8 पैकी फक्त एकच सामना जिंकला असून 7 मॅचमध्ये त्यांचा पराभव झाला, त्यामुळे त्यांच्या खात्यात 2 पॉईंट्स आहेत. आता हैदराबादच्या टीमने उरलेल्या 6 मॅच जिंकल्या तरी त्यांचे 14 पॉईंट्स होतील, त्यामुळे प्ले-ऑफमध्ये पोहोचण्यासाठी त्यांना इतर टीमची कामगिरी आणि नेट रन रेटवर अवलंबून राहावं लागणार आहे. पहिल्या 8 पैकी 7 मॅचमध्ये पराभूत होणारी हैदराबाद आयपीएल इतिहासातली पाचवी टीम ठरली आहे. याआधी कोलकात्याने 2009 साली, पंजाबने 2010 साली, दिल्लीने 2013 साली, आरसीबीने 2019 साली 8 पैकी 7 मॅच हरल्या होत्या.
    Published by:Shreyas
    First published:

    Tags: Delhi capitals, IPL 2021, SRH

    पुढील बातम्या