मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /IPL 2021: 'हे त्यांच्यासोबत का घडत नाही?' वॉर्नरला मिळालेल्या वागणुकीवर गावसकरांचा सवाल

IPL 2021: 'हे त्यांच्यासोबत का घडत नाही?' वॉर्नरला मिळालेल्या वागणुकीवर गावसकरांचा सवाल

कोरोना व्हायरसच्या उद्रेकामुळे आयपीएल स्पर्धा (IPL 2021) स्थगित करावी लागली. ही स्पर्धा स्थगित होण्यापूर्वी सनरायझर्स हैदराबादची (SRH) या सिझनमधील कामगिरी निराशाजनक झाली होती.

कोरोना व्हायरसच्या उद्रेकामुळे आयपीएल स्पर्धा (IPL 2021) स्थगित करावी लागली. ही स्पर्धा स्थगित होण्यापूर्वी सनरायझर्स हैदराबादची (SRH) या सिझनमधील कामगिरी निराशाजनक झाली होती.

कोरोना व्हायरसच्या उद्रेकामुळे आयपीएल स्पर्धा (IPL 2021) स्थगित करावी लागली. ही स्पर्धा स्थगित होण्यापूर्वी सनरायझर्स हैदराबादची (SRH) या सिझनमधील कामगिरी निराशाजनक झाली होती.

मुंबई, 13 मे: कोरोना व्हायरसच्या उद्रेकामुळे आयपीएल स्पर्धा (IPL 2021) स्थगित करावी लागली. ही स्पर्धा स्थगित होण्यापूर्वी सनरायझर्स हैदराबादची (SRH) या सिझनमधील कामगिरी निराशाजनक झाली होती. हैदराबादनं पहिल्या 7 पैकी फक्त 1 सामना जिंकला. या खराब कामगिरीमुळे हैदराबादच्या मॅनेजमेंटनं डेव्हिड वॉर्नरची (David Warner) आधी कॅप्टनपदावरुन आणि नंतर टीममधून हकालपट्टी केली. डेव्हिड वॉर्नरला मिळालेल्या या वागणुकीवर भारताचे महान क्रिकेटपटू सुनील गावसकर (Sunil Gavaskar) यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

गावसकर यांनी 'स्पोर्ट्सस्टार'साठी लिहिलेल्या कॉलममध्ये या निर्णयावर नाराजी व्यक्त केली आहे.  त्याचबरोबर कॅप्टनसारखी कोचला वागणूक का दिली जात नाही?' असा सवाल उपस्थित केला आहे. गावसकर यांनी या कॉलममध्ये लिहिले आहे,' डेव्हिड वॉर्नर रन काढत होता. तो मागच्या वर्षीसारखा आक्रमक नव्हता. तरीही त्याला मिळणारा खेळाडूंचा पाठिंबा ही मोठी गोष्ट होती. त्याची प्लेईंग इलेव्हनमधून हकालपट्टी करण्यात आली. हे धक्कादायक होते. कॅप्टनसीची पर्वा न करता तो टीमची गरज पूर्ण करणाऱ्या बॅट्समनची भूमिका पार पाडू शकत होता.'

गावसकर यांनी पुढं लिहलं आहे, 'त्यानं कॅप्टन म्हणून केलेल्या चुका आणि त्याच्या हकालपट्टीचा निर्णय या विषयावर वाद होऊ शकतो. मात्र जसं कॅप्टनला बदललं जातं, तोच न्याय कोचला का लावला जात नाही. फुटबॉल टीमच्या कामगिरीचं मूल्यमापन करताना सर्वात पहिल्यांदा मॅनेजरला बाहेरचा रस्ता दाखवला जातो. हे क्रिकेटमध्ये का होत नाही?'

'आयपीएल 2021 स्थगित होण्यापूर्वी सनरायझर्स हैदराबादनं फक्त एक मॅच जिंकली होती. काही टीमना या निर्णायामुळे त्रास सहन करावा लागणार आहे. कारण, त्यांना एक लय सापडली होती. हैदराबादच्या टीमला या निर्णयामुळे दिलासा मिळणार आहे. ते ज्या पद्धतीनं ही स्पर्धा खेळत होते ते खूप निराशाजनक होते ' असं गावसकर यांनी या कॉलमध्ये लिहलं आहे.

VIDEO: SRH च्या आजी-माजी कॅप्टनची मालदीवमध्ये एकत्र धमाल

'सनरायझर्स हैदराबादची सुरुवात एका वाईट स्वप्नासारखी झाली होती. ही स्पर्धा स्थगित झाल्यानं त्यांना दिलासा मिळाला आहे. त्यामुळे ते शांतपणे याबाबत विचार करु शकतील.' असं मत गावसकर यांनी व्यक्त केलं आहे.

First published:

Tags: David warner, IPL 2021, Sunil gavaskar, Sunrisers hyderabad