मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

'मी त्यांना 2-3 थप्पड लगावल्या असत्या', आपल्याच खेळाडूंवर रणतुंगा संतापला

'मी त्यांना 2-3 थप्पड लगावल्या असत्या', आपल्याच खेळाडूंवर रणतुंगा संतापला

श्रीलंकेची टीम सध्या इंग्लंडमध्ये आहे. या टीममधील खेळाडूंनी सिगारेट पिण्यासाठी बायो-बबलचं उल्लंघन केलं होतं. या खेळाडूंवर वर्ल्ड कप विजेता कॅप्टन अर्जुन रणतुंगा  (Arjuna Ranatunga) संतापला आहे.

  • Published by:  News18 Desk

मुंबई, 3 जुलै : श्रीलंकेची टीम सध्या इंग्लंडमध्ये आहे. या मालिकेत टीमला आजवर एकही विजय मिळवता आलेला नाही. त्याचबरोबर या टीमच्या तीन खेळाडूंनी बायो-बबल मोडल्याचं उघड झालं. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. कुसल मेंडिस (Kusal Mendis), निरोशन डिकवेला (Niroshan Dickwella) आणि धनुष्का गुणतिलका (Danushka Gunathilaka) यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे.

इंग्लंड दौऱ्यावर असलेले हे खेळाडू तिसऱ्या टी-20 नंतर डरहममधल्या हॉटेलमधून बाहेर गेले. हॉटेल बाहेरच्या रस्त्यावर खेळाडू सिगरेट पिताना आढळले. हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर त्यांना तातडीने श्रीलंकेला पाठवण्यात आले असून त्यांच्यावर एक वर्षांची बंदी घालण्यात आली आहे.

'मी थप्पड लगावली असती'

श्रीलंकेला वर्ल्ड कप जिंकवून देणारा कर्णधार अर्जुन रणतुंगा (Arjuna Ranatunga) खेळाडूंच्या या कृतीमुळे नाराज झाला आहे. ‘डेली मिरर’ ला दिलेल्या मुलाखतीमध्ये रणतुंगानं या खेळाडूंवर जोरदार टीका केली आहे. ‘मी खेळाडूंना सोशल मीडिया वापण्याची संधी दिली नसती. ते फेसबुक, इन्स्टाग्रामचा वापर करतात. क्रिकेट खेळण्याचं सोडून सर्व काही करणाऱ्या या खेळाडूंवर बोर्ड काहीच कारवाई करत नाही. त्यांना फक्त प्रसिद्धी हवी आहे. मी टीमचा कॅप्टन असतो आणि माझ्या टीममध्ये या तिघांनी ही कृती केली असती तर मी त्यांना तीन-चार थप्पड लगावल्या असत्या,’ अशी संतप्त प्रतिक्रिया रणतुंगानं दिली आहे.

श्रीलंका बोर्डावर टीका

भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यात 13 जुलैपासून मालिकेला सुरुवात होत आहे. भारताचा कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) आणि उपकर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) यांच्यासह महत्त्वाचे खेळाडू इंग्लंड दौऱ्यावर आहेत, त्यामुळे श्रीलंका दौऱ्यासाठी नवोदितांना संधी देण्यात आली आहे. शिखर धवन (Shikhar Dhawan) याच्याकडे या टीमचं नेतृत्व देण्यात आलं आहे.

‘त्याला कुणी तरी सांगा...’ रितिकानं केलं रोहित शर्माला ट्रोल

'भारताने दुसऱ्या श्रेणीची टीम पाठवणं हा आमच्या क्रिकेटचा अपमान आहे. टीव्ही आणि मार्केटिंगच्या गरजा पूर्ण करण्यासाठी ही सीरिज खेळवायला तयार झालेल्या श्रीलंका क्रिकेट बोर्डाला मी दोषी मानतो. श्रीलंका क्रिकेटसाठी हे लाजीरवाणं आहे. भारताने त्यांची सर्वोत्तम टीम इंग्लंडला पाठवली आहे, तर दुय्यम टीम इकडे खेळणार आहे,' असं रणतुंगा म्हणाला.

First published:

Tags: Cricket news, Sri lanka