• Home
 • »
 • News
 • »
 • sport
 • »
 • IPL 2021: जम्मू काश्मीरची नवी 'स्पीड गन', पहिल्याच मॅचमध्ये रचला इतिहास

IPL 2021: जम्मू काश्मीरची नवी 'स्पीड गन', पहिल्याच मॅचमध्ये रचला इतिहास

रविवारी झालेल्या मॅचमध्ये देखील हैदराबादचा कोलकाता नाईट रायडर्सनं (SRH vs KKR) 6 विकेट्सनं पराभव केला. या खराब कामगिरीतही एक दिलासादायक गोष्ट टीमसाठी घडली आहे.

 • Share this:
  मुंबई, 4 ऑक्टोबर : आयपीएल स्पर्धेत (IPL 2021) सनरायझर्स हैदराबादची (SRH) निराशाजनक कामगिरी सुरू आहे. हैदराबादची टीमचं या आयपीएलमधील आव्हान यापूर्वीच संपुष्टात आलं आहे. रविवारी झालेल्या मॅचमध्ये देखील हैदराबादचा  कोलकाता नाईट रायडर्सनं (SRH vs KKR) 6 विकेट्सनं पराभव केला. या खराब कामगिरीतही एक दिलासादायक गोष्ट टीमसाठी घडली आहे. या टीमला भविष्यातील एक खेळाडू मिळाला आहे. जम्मू काश्मीरचा फास्ट बॉलर उमरान मलिक (Umran Malik) यानं आयपीएल पदार्पणातच त्याच्या बॉलिंगनं सर्वांना प्रभावित केले. केकेआर विरुद्धच्या मॅचमध्ये त्यानं आयपीएल स्पर्धेत पदार्पण केलं. या मॅचमध्ये त्यानं 150.06 प्रती तास वेगानं बॉल टाकला.  या सिझनमध्ये कोणत्याही भारतीय बॉलरनं फेकलेला हा सर्वात वेगवान बॉल आहे. टी. नटराजनला कोरोनाची लागण झाल्यानंतर हैदराबादनं काही दिवसांपुरता उमरानचा टीममध्ये समावेश केला आहे. तो यापूर्वी टीमचा नेट बॉलर होता. नटराजन कोरोनातून पूर्ण बरा होईपर्यंत तो टीमचा सदस्य असेल. रविवारच्या मॅचमध्ये त्याला एकही विकेट मिळाली नाही. पण, पहिल्याच मॅचमध्ये त्यानं वेगानं सर्वांना प्रभावित केले. 'कनफ्यूजन ही कनफ्यूजन', तरच Mumbai Indians Play Off ला पोहोचणार! उमराननं यावर्षीच सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी स्पर्धेत जम्मू काश्मीरकडून पदार्पण केले. त्यानं जम्मू काश्मीरकडून आजवर एक टी20 आणि एक लिस्ट A मॅच खेळली आहे. त्याचा संदीप शर्माच्या जागी टीममध्ये समावेश करण्यात आला होता. या मॅचमध्ये त्यानं चौथ्या ओव्हरमध्ये वेगवान बॉलिंग केली. उमराननं 4 ओव्हरमध्ये 27 रन दिले.  उमरानच्यापूर्वी या सिझनमध्ये मोहम्मद सिराजनं भारतीय बॉलर्मसमध्ये सर्वात वेगवान बॉल टाकला होता. RESULT DATA: KKR विजयी हैदराबादने दिलेलं 116 रनचं आव्हान केकेआरने 19.4 ओव्हरमध्ये 4 विकेट गमावून पूर्ण केलं. शुभमन गिलने (Shubhaman Gill) 51 बॉलमध्ये सर्वाधिक 57 रन केले, तर नितीश राणाने 25 रनची खेळी केली. दिनेश कार्तिक 18 रनवर नाबाद राहिला. हैदराबादकडून जेसन होल्डरने सर्वाधिक 2 विकेट घेतल्या, तर राशिद खान आणि सिद्धार्थ कौलला प्रत्येकी 1-1 विकेट मिळाली.
  Published by:News18 Desk
  First published: