चेन्नई, 26 एप्रिल: आयपीएल 2021 (IPL 2021) मध्ये क्रिकेट फॅन्सना 'सुपर संडे'चा थरार अनुभवयाला मिळाला. रविवारच्या पहिल्या मॅचमध्ये रवींद्र जडेजाच्या (Ravindra Jadeja) ऑल राऊंड कामगिरीनं सर्वांची मनं जिंकली. तर सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स (SRH vs DC) या रविवारच्या दुसऱ्या मॅचमध्ये सुपर ओव्हरचा (Super Over) थरार रंगला. या सिझनमध्ये सुपर ओव्हरपर्यंत लांबलेली ही पहिलीच मॅच आहे. सनरायझर्स हैदराबादचा कॅप्टन डेव्हिड वॉर्नर (David Warner) याच्या एका निर्णयावर टीम इंडियाचा माजी बॅट्समन वीरेंद्र सेहवाग (Virender Sehwag) यानं तिखट प्रतिक्रिया दिली आहे.
दिल्लीनं दिलेलं 160 रनचं आव्हान पार करण्यासाठी आलेल्या हैदराबादला 20 ओव्हरमध्ये 159 रनच करता आल्या. केन विल्यमसननं 51 बॉलमध्ये नाबाद 66 रन केले. तर जगदीश सुचीतनं शेवटच्या क्षणी 6 बॉलमध्ये नाबाद 14 रनची आक्रमक खेळी करत मॅच सुपर ओव्हरपर्यंत नेली. हैदराबादच्या या धावसंख्येचा पाया जॉनी बेयरस्टो (Jonny Bairstow) यानं रचला. त्यानं 18 बॉलमध्येच 3 फोर आणि 4 सिक्सच्या मदतीनं 38 रनची खेळी केली होती.
सध्या फॉर्मात असलेला आणि दिल्लीविरुद्ध आक्रमक खेळी केलेला बेयरस्टो सुपर ओव्हरमध्ये बॅटींगला येईल, असाच सर्वांचा अंदाज होता. पण प्रत्यक्षात हैदराबादचा कॅप्टन डेव्हिड वॉर्नरसह केन विल्यमसन सुपर ओव्हरमध्ये बॅटींगला आला. या दोघांना 6 बॉलमध्ये 7 रन काढता आले. वॉर्नरच्या या निर्णयावर सेहवागनं जोरदार नाराजी व्यक्त केली आहे.
वीरेंद्र सेहवागनं या विषयावर खरमरीत ट्विट केलं आहे. "जर बेयरस्टो टॉयलेटमध्ये नसेल तर मला ही गोष्ट समजलेली नाही. 18 बॉलमध्ये 38 रन केल्यानंतरही तो सनरायझर्स हैदराबादची पहिली पसंती का नव्हता? हैदराबादच्या टीमनं या मॅचमध्ये जोरदार संघर्ष केला, पण या पराभवाला ते स्वत: जबाबदार आहेत. त्यांनी चमत्कारिक निर्णय घेतले.''
Unless Bairstow was in toilet, can't get why would he not be your first choice in a #SuperOver when he scored 38 of 18 in the main innings and looked the cleanest hitter. Baffling, Hyderabad fought well but have only themselves to blame for strange decisions. #SRHvsDC
— Virender Sehwag (@virendersehwag) April 25, 2021
चेन्नईविरुद्धच्या पराभवानंतर विराटसाठी नवी डोकेदुखी, आता खेळणं होणार अवघड!
हैदराबादनं 6 बॉलमध्ये 8 रन काढण्याचं दिलेलं आव्हान दिल्ली कॅपिटल्सनं शेवटच्या बॉलवर पूर्ण केलं.सनरायझर्स हैदराबादचा हा पाच मॅचमधील चौथा पराभव असून ते सध्या पॉईंट टेबलमध्ये सातव्या क्रमांकावर आहेत. तर दिल्ली कॅपिटल्सनं रविवारी पाचपैकी चौथा विजय मिळवला आहे. दिल्लीची टीम सध्या पॉईंट टेबलमध्ये दुसऱ्या क्रमांकावर आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Cricket, David warner, IPL 2021, SRH, Sunrisers hyderabad, Virender sehwag