IPL 2021: सर्वात महागड्या ख्रिस मॉरीसचा 'पैसा वसूल' खेळ, राजस्थानचा पहिला विजय

IPL 2021: सर्वात महागड्या ख्रिस मॉरीसचा 'पैसा वसूल' खेळ, राजस्थानचा पहिला विजय

आयपीएल लिलावात सर्वात महाग ठरलेल्या ख्रिस मॉरीसनं (Chris Morris) निर्णायक क्षणी 'पैसा वसूल' खेळ करत राजस्थान रॉयल्सला विजय मिळवून दिला आहे.

  • Share this:

मुंबई, 15 एप्रिल :  आयपीएल लिलावात सर्वात महाग ठरलेल्या ख्रिस मॉरीसनं (Chris Morris) निर्णायक क्षणी 'पैसा वसूल' खेळ करत राजस्थान रॉयल्सला विजय मिळवून दिला आहे. राजस्थानला 2 ओव्हरमध्ये 27 रन हवे होते. त्यावेळी मॉरीसनं कागिसो रबाडाच्या एकाच ओव्हरमध्ये 15 रन काढले. त्यानंतर त्यानं शेवटच्या ओव्हरमध्ये आवश्यक असलेले 12 रन फक्त 4 बॉलमध्ये पूर्ण केले.  मॉरिसनं फक्त 18 बॉलमध्ये 36 रनची खेळी करत राजस्थान रॉयल्सला 2 बॉल आणि 3 विकेट्स राखून विजय मिळवून दिला. राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) कडून डेव्हिड मिलरनं आक्रमक अर्धशतक झळकावत 62 रन काढले.

दिल्ली कॅपिटल्सच्या 148 रनचा पाठलाग करताना राजस्थानची सुरुवात खराब झाली. जोस बटलर (Jos Buttler) आणि मनन व्होरा (Manan Vora) झटपट आऊट झाले. पहिल्या मॅचमध्ये शतक झळकावणाऱ्या संजू सॅमसनकडून (Sanju Samson) राजस्थाला मोठी आशा होती.  संजूला ही अपेक्षा पूर्ण करता आली नाही. तो फक्त 4 रन काढून आऊट झाला. त्याला कागिसो रबाडानं (Kagiso Rabada) आऊट केलं.

सॅमसन आऊट झाल्यानंतर शिवम दुबे आणि रियान पराग या राजस्थानच्या युवा बॅट्समननं निराशा केली. त्यानंतर डेव्हिड मिलरनं राहुल तेवातियासोबत 48 रनची पार्टरनरशिप करत राजस्थानचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. रबाडानं तेवातियाला आऊट करत ही जोडी फोडली.

तेवातिया आऊट झाल्यानंतर डेव्हिड मिलरनं आवेश खानच्या एकाच ओव्हरमध्ये सलग दोन सिक्स मारले. त्यानंतर तिसरा सिक्स लगावण्याच्या प्रयत्नात तो आऊट झाला. राजस्थानचा पराभव निश्चित आहे असं वाटत असतानाच मॉरीसनं 200 च्या स्ट्राईकनं फटकेबाजी करत राजस्थानला विजय मिळवून दिला. या खेळीत मॉरीसनं 4 सिक्स लगावले.

यापूर्वी दिल्ली कॅपिटल्सनं ऋषभ पंतच्या अर्धशतकाच्या जोरावर 20 ओव्हरमध्ये 7 आऊट 148 पर्यंत मजल मारली. दिल्लीच्या टॉप ऑर्डरनं निराशा केल्यानंतर पंतनं कॅप्टनला साजेसा खेळ करत  टीमला सावरलं. त्यानं ललित यादवसोबत पाचव्या विकेटसाठी 51 रनची पार्टरनरशिप केली. रियान परागच्या थेट थ्रो मुळे पंत रन आऊट झाला. त्यापूर्वी त्यानं 51 रन केले होते.

2 वेळा सलग 6 सिक्स, 40 ओव्हरमध्ये 200 रन करणारा 'हा' आहे पंतचा नवा साथीदार

टॉम करन आणि ख्रिस वोक्सनं केलेल्या फटकेबाजीमुळे दिल्लीनं 7 आऊट 148 पर्यंत मजल मारली. राजस्थानकडून जयदेव उनाडकतनं सर्वात जास्त 3 विकेट्स घेतल्या.

Published by: News18 Desk
First published: April 15, 2021, 11:24 PM IST

ताज्या बातम्या