IPL 2021: 'कोहलीसारखा कॅप्टन पहिल्यांदाच पाहिला', वाचा गंभीर असं का म्हणाला?

IPL 2021: 'कोहलीसारखा कॅप्टन पहिल्यांदाच पाहिला', वाचा गंभीर असं का म्हणाला?

केकेआरचा माजी कॅप्टन गौतम गंभीर (Gautam Gambhir) याने कोहलीच्या डावपेचांवर अनेकदा प्रश्न विचाीरले आहेत. गंभीर बुधवारी असं काही म्हणाला की ते ऐकून भविष्यात विराट कोहलीला देखील विचार करावा लागणार आहे.

  • Share this:

चेन्नई, 14 एप्रिल: आयपीएल स्पर्धेचं विजेतेपद पटकावण्यात आजवर अपयशी ठरलेल्या विराट कोहलीच्या (Virat Kohli) कॅप्टनसीवर अनेकदा प्रश्न विचारले जातात. विशेषत: केकेआरचा माजी कॅप्टन गौतम गंभीर (Gautam Gambhir) याने कोहलीच्या डावपेचांवर अनेकदा प्रश्न विचाीरले आहेत. गंभीर बुधवारी असं काही म्हणाला की ते ऐकून भविष्यात विराट कोहलीला देखील विचार करावा लागणार आहे.

विराटनं हैदरबाद विरुद्धच्या मॅचमध्ये टॉसनंतर केलेल्या वक्तव्यावर गंभीरला धक्का बसला आहे. "आम्हाला पहिल्यांदा बॅटींग करायची होती आणि तिसऱ्या क्रमांकावर शाहबाज अहमद खेळणार आहे." असं विराटनं टॉस झाल्यानंतर लगेच सांगितलं होतं. त्यावर गंभीरनं प्रश्न उपस्थित केला आहे. गौतम गंभीरनं 'स्टार स्पोर्ट्स'वर कॉमेंट्री दरम्यान सांगितले की "मी पहिल्यांदा असा कॅप्टन पाहिला आहे की तो 3 नंबरला कोण बॅटींग करणार आहे हे सांगत आहे."

गंभीरनं या कॉमेंट्रीच्या दरम्यान कोहलीच्या कॅप्टनसीवर त्याचं मत व्यक्त केलं आहे. गंभीरच्या मते डीव्हिलियर्सनं तिसऱ्या क्रमांकावर बॅटींग करायला हवी. त्यानंतर ग्लेन मॅक्सवेलनं बॅटींग करायला हवी. मात्र आरसीबी मॅक्सवेलला चौथ्या आणि डीव्हिलियर्सला पाचव्या क्रमांकावर खेळवत आहे.

विराटचे डावपेच अंगलट

विराट कोहलीनं शाहबाज अहमदला 3 नंबरवर बॅटींग करण्याची संधी दिली. मात्र शाहबाजला 10 बॉलमध्ये 14 रनच काढता आले. चांगल्या सुरुवातीनंतर शाहबाज नदीमच्या बॉलवर आऊट झाला. तो पहिल्या मॅचमध्ये देखील फ्लॉप ठरला होता. यापूर्वी प्रॅक्टीस मॅचमध्ये त्यानं चांगली कामगिरी केली होती. त्याच्याच आधारावर आरसीबीनं त्याला संधी दिली होती.

डेव्हिड वॉर्नरची अचूक चाल, फक्त 4 बॉलमध्ये विराटचं 'ट्रम्प कार्ड' फेल

विराट कोहलीला देखील मोठा स्कोअर करण्यात अपयश आलं. विराट सेट झाल्यानंतर आऊट झाला.  त्यानं 29 बॉलमध्ये 33 रन काढले. विराटला जेसन होल्डरनं आऊट केलं.

Published by: News18 Desk
First published: April 14, 2021, 10:02 PM IST

ताज्या बातम्या