अहमदाबाद, 1 मे : विराट कोहलीच्या (Virat Kohli) नेतृत्त्वाखाली खेळणाऱ्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (RCB) चा पंजाब किंग्जनं (PBKS) 34 रननं पराभव केला. या पराभवानंतर आरसीबी पॉईंट टेबलमध्ये तिसऱ्या क्रमांकावर आहे. पंजाबकडून कॅप्टन केएल राहुलनं (KL Rahul) सर्वात जास्त नाबाद 91 रन काढले. तर आरसीबीकडून विराट कोहलीनं सर्वात जास्त 35 रन केले. कोहलीला हरप्रीर बरार (Harpreet Brar) यानं क्लीन बोल्ड केलं.
हरप्रीतच्या आयपीएल करियरमधील विराट कोहली ही पहिली विकेट आहे. विराटला आऊट केल्यानं खूप आनंदी आहे. हा प्रसंग मला दीर्घकाळ लक्षात राहिलं अशी भावना हरप्रीतनं बोलून दाखवली. विराट कोहलीनं देखील मॅच संपल्यानंतर बरारची भेट घेतली. या दोघांमध्ये बराच वेळ चर्चा झाली. त्यांच्या चर्चेचा व्हिडीओ सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल (Viral) झाला आहे.
बंगळुरु विरुद्ध केलेल्या भन्नाट बॉलिंगबद्दल कोहलीनं बरारची प्रशंसा केली. या मॅचमध्ये पंजाबनं पहिल्यांदा बॅटींग करताना निर्धारित 20 ओव्हर्समध्ये 5 आऊट 179 रन केले होते. त्यानंतर आरसीबीला 20 ओव्हर्समध्ये 8 आऊट 145 रनच करता आले. बरारनं कॅप्टन कोहली, मॅक्सवेल आणि एबी डीव्हिलियर्स या आरसीबीच्या तीन दिग्गजांना आऊट करत पंजाबच्या विजयाचा मार्ग मोकळा केला.
First, the wicket & then, the appreciation from the man himself! @thisisbrar will surely cherish this moment with @imVkohli! #VIVOIPL #PBKSvRCB pic.twitter.com/ovXmadbyKN
— IndianPremierLeague (@IPL) April 30, 2021
IPL 2021: कोहली, मॅक्सवेल आणि डीव्हिलियर्सला आऊट करणारा हरप्रीत कोण आहे?
बरारनं बॉलिंग प्रमाणेच बॅटींगमध्येही चमकदार कामगिरी केली. त्यानं 17 बॉलमध्ये नाबाद 25 रन काढले. या ऑलराऊंड कामगिरीबद्दल त्याला 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्कारानं गौरवण्यात आलं. बंगळुरुचा 7 मॅचमधील हा दुसरा पराभव आहे. तर पंजाबचा इतक्याच मॅचमधील तिसरा विजय आहे. सध्या पॉईंट टेबलमध्ये पंजाब 6 पॉईंट्सह 5 व्या तर बंगळुरु 10 पॉईंट्ससह तिसऱ्या क्रमांकावर आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: IPL 2021, Punjab kings, RCB, Video viral, Virat kohli