
मुंबई, 4 ऑक्टोबर : वेस्ट इंडिजचे दिग्गज क्रिकेटपटू ड्वेन ब्राव्हो (Dwayane Bravo) आणि कायरन पोलार्ड (Kieron Pollard) यांच्यातील एक बातचित सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. PC: Dwayne Bravo/ Kieron Pollard instagram)

वेस्ट इंडिजचा ऑल राऊंडर कायरन पोलार्डनंही ज्युनिअर ब्राव्होला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. त्याला उत्तर देताना ब्राव्होनं हा तुझा जावई असल्याचं पोलार्डला सांगितलं.

पोलार्डनंही त्यावर मजेशीर उत्तर दिलं. 'तू उशीरा झोपतोस, स्वप्नं पाहणं थांबव', असं पोलार्ड ब्राव्होला म्हणाला.

सध्या दोन्ही खेळाडू आयपीएल स्पर्धेत (IPL 2021) व्यस्त आहेत. या स्पर्धेत ब्राव्हो चेन्नई सुपर किंग्सचा (CSK) सदस्य आहे. (AFP)

पोलार्ड मुंबई इंडियन्सचा सदस्य आहे. या दोघांनी आत्तापर्यंत बॅटनी फार कमाल केलेली नाही. पण जोरदार बॉलिंग केली आहे. (PTI)

ब्राव्होनं मागील 3 मॅचमध्ये 8 विकेट्स घेतल्या आहेत. तर पोलार्डनं 2 विकेट्स घेतल्या आहेत. मुंबई इंडियन्सची टीम पॉईंट टेबलमध्ये सध्या सातव्या क्रमांकावर आहे. त्यांचा प्ले ऑफ मध्ये जाण्यासाठी संघर्ष सुरू आहे. तर चेन्नई सुपर किंग्सनं प्ले ऑफमधील प्रवेश निश्चित केला आहे. (Kieron Pollard instafram)




