• Home
 • »
 • News
 • »
 • sport
 • »
 • IPL 2021, RCB vs CSK: धोनी सेनेला हरवण्यासाठी विराटला पार करावी लागणार 5 आव्हानं

IPL 2021, RCB vs CSK: धोनी सेनेला हरवण्यासाठी विराटला पार करावी लागणार 5 आव्हानं

विराट कोहलीच्या (Virat Kohli) रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) टीमनं आयपीएल स्पर्धेच्या पहिल्या टप्प्यात (IPL 2021 Phase 1) दमदार कामगिरी केली होती. मात्र दुसऱ्या टप्प्यात त्यांची खराब सुरूवात झाली आहे.

 • Share this:
  मुंबई, 24 सप्टेंबर : विराट कोहलीच्या (Virat Kohli) रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) टीमनं आयपीएल स्पर्धेच्या पहिल्या टप्प्यात (IPL 2021 Phase 1) दमदार कामगिरी केली होती. मात्र दुसऱ्या टप्प्यात त्यांची खराब सुरूवात झाली आहे. केकेआर विरुद्ध आरसीबीचा 9 विकेट्सनं मोठा पराभव झाला. आता आरसीबीला हा पराभव विसरुन चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध शारजामध्ये होणाऱ्या लढतीत (RCB vs CSK) उतरावं लागणार आहे. महेंद्रसिंह धोनीची (MS Dhoni) चेन्नईची टीम सध्या दमदार फॉर्मात आहे. त्यांना पराभूत करण्यासाठी विराट कोहलीसमोर 5 प्रमुख आव्हानं आहेत विराट कोहलीकडून मोठ्या खेळीची अपेक्षा आरसीबीचा कॅप्टन विराट कोहली (Virat Kohli) या स्पर्धेत नेहमीच्या फॉर्ममध्ये दिसलेला नाही. त्यानं 8 मॅचमध्ये फक्त 203 रन केले असून फक्त 1 अर्धशतक झळकावले आहे. विराट कोहली सध्या आरसीबीच्या बॅटींगची सुरूवात करतो. आरसीबीच्या विजयासाठी  त्याला एक बाजू लावून धरत मोठा स्कोर करावा लागेल. सकारात्मक कॅप्टनसी विराट कोहलीनं भारतीय टी20 टीम आणि आरसीबीच्या टीमची कॅप्टनसी सोडण्याचा निर्णय जाहीर केला आहे. तो या आयपीएल नंतर आरसीबीचा कॅप्टन नसेल. त्यामुळे विराटला कॅप्टन म्हणून आयपीएल स्पर्धा जिंकण्याची शेवटची संधी आहे. ही संधी साध्य करण्यासाठी त्याला चेन्नईविरुद्ध संपूर्ण सकारात्मक विचारानं मैदानात उतरावं लागेल. मागच्या मॅचमध्ये विराटच्या बॉडी लँग्वेजवर तज्ज्ञांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. फास्ट बॉलर्सवर जबाबदारी मागील मॅचमध्ये केकेआरनं फक्त 1 विकेट गमावून आरसीबीनं दिलेलं 93 रनचं आव्हान पूर्ण केलं होतं. त्या मॅचमध्ये मोहम्मद सिराज, काइल जेमीसन आणि हर्षल पटेल यांची कामगिरी खराब झाली होती. आरसीबीच्या या फास्ट बॉलर्सना टीमला विजय मिळवून देण्यासाठी पुन्हा एकदा फॉर्मात येणे आवश्यक आहे. 152 KMPH च्या वेगानं बॉलिंग करणाऱ्या बॉलरला विराट देणार संधी! चेन्नईच्या ओपनिंग जोडीचा धोका चेन्नई सुपर किंग्सची ऋतुराज गायकवाड आणि फाफ ड्यू प्लेसी ही ओपनिंग जोडी जबरदस्त फॉर्मात आहे. ऋतुराजनं मागच्या मॅचमध्ये मुंबई विरुद्ध 88 रनची खेळी केली होती. तर ड्यू प्लेसिसनं देखील चार अर्धशतकासह 320 रन काढले आहेत. आरसीबीला शुक्रवारच्या मॅचमध्ये या दोघांना झटपट आऊट करावं लागेल. ORANGE CAP: मॅक्सवेल - डीव्हिलियर्स जोडीवर भिस्त आरसीबीची सर्वात मोठी शक्ती ही त्यांची ग्लेन मॅक्सवेल आणि एबी डिव्हिलियर्स ही आक्रमक जोडी आहे. या दोघांनी मोठी खेळी केली नाही तर आरसीबीची टीम कोसळते. मागील मॅचमध्ये हे पुन्हा एकदा सिद्ध झालं. आता चेन्नईविरुद्धची मॅच जिंकण्यासाठी या जोडीला पुन्हा एकदा फॉर्मात यावं लागेल.
  Published by:News18 Desk
  First published: