जाहिरात
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / IPL 2021, RCB vs CSK : 152 KMPH च्या वेगानं बॉलिंग करणाऱ्या बॉलरला विराट देणार संधी!

IPL 2021, RCB vs CSK : 152 KMPH च्या वेगानं बॉलिंग करणाऱ्या बॉलरला विराट देणार संधी!

IPL 2021, RCB vs CSK : 152 KMPH च्या वेगानं बॉलिंग करणाऱ्या बॉलरला विराट देणार संधी!

यूएईच्या पिचवर फास्ट बॉलर्सना चांगली मदत मिळत आहे. ते पाहून विराट कोहली (Virat Kohli) आयपपीएल इतिहासातील सर्वात फास्ट भारतीय बॉलरचा टीममध्ये समावेश करण्याची शक्यता आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 24 सप्टेंबर : आयपीएल स्पर्धेतील (IPL 2021) 35 वी मॅच रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स (RCB vs CSK) यांच्यात होणार आहे. आयपीएल  स्पर्धेच्या दुसऱ्या टप्प्यात बंगळुरूची (RCB) सुरुवात निराशाजनक झाली आहे. त्यांचा कोलकाता नाईट रायडर्सनं (KKR) मोठा पराभव केला. तर चेन्नईनं (CSK) मुंबई इंडियन्सचा पराभव करत चांगली सुरूवात केली आहे. यूएईच्या पिचवर फास्ट बॉलर्सना चांगली मदत मिळत आहे. ते पाहून विराट कोहली (Virat Kohli) आयपपीएल इतिहासातील सर्वात फास्ट भारतीय बॉलरचा टीममध्ये समावेश करण्याची शक्यता आहे. आरसीबीचा नवदीप सैनी (Navdeep Saini) त्याच्या वेगासाठी प्रसिद्ध आहे. सैनी आयपीएल 2019 आणि 20 मध्ये सर्वाधिक वेगानं बॉल टाकणारा भारतीय बनला होता. त्यानं 2019 च्या आयपीएलमध्ये 152.85 किलोमीटर प्रती तास या वेगानं बॉल टाकला होता. सैनीला नुकत्याच झालेल्या श्रीलंका दौऱ्यात एक वन-डे आणि एक टी20 मॅचमध्ये संधी मिळाली होती. यामध्ये तो विकेट घेण्यात अपयशी ठरला. पण, यूएईच्या पिचवर तो वेग आणि बाऊन्सच्या जोरावर बॅटरना अडचणीत आणू शकतो. RCB मध्ये होणार भूकंप! विराट कोहलीची कर्णधारपदावरुन हकालपट्टी होणार? माजी भारतीय क्रिकेटपटू आकाश चोप्रानं देखील आरसीबीनं नवदीप सैनीचा टीममध्ये समावेश करावा, असा सल्ला दिला आहे. SCHEDULE TIME TABLE: आरसीबीची संभाव्य Playing 11 : देवदत्त पडिक्कल, विराट कोहली (कॅप्टन), केएस भरत (विकेटकीपर), ग्लेन मॅक्सवेल, एबी डिविलियर्स, सचिन बेबी, वानिन्दु हसरंगा, काइल जेमिसन, हर्षल पटेल/नवदीप सैनी, मोहम्मद सिराज आणि  युजवेंद्र चहल. सीएसकेची संभाव्य Playing 11: ऋतुराज गायकवाड़, फाफ ड्यू प्लेसी, मोईन अली, अंबाती रायडू, सुरेश रैना, महेंद्र सिंह धोनी (कॅप्टन आणि विकेट किपर), रविंद्र जडेजा, ड्वेन ब्रावो, शार्दुल ठाकुर, दीपक चहर आणि जोश हेजलवुड.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात