Home /News /sport /

IPL 2021, RCB vs CSK: विराट कोहली बनला 'सुपर मॅन', हवेत घेतला जबरदस्त कॅच! पाहा VIDEO

IPL 2021, RCB vs CSK: विराट कोहली बनला 'सुपर मॅन', हवेत घेतला जबरदस्त कॅच! पाहा VIDEO

चेन्नई सुपर किंग्स विरुद्धच्या मॅचमध्ये (RCB vs CSK) विराटच्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू टीमचा पराभव झाला. या पराभवातही विराटनं (Virat Kohli) त्याच्या खेळानं सर्वांची मनं जिंकली.

  मुंबई, 25 सप्टेंबर : विराट कोहली (Virat Kohli) हा सध्या क्रिकेट विश्वातील सर्वोत्तम बॅटर आहे. त्याचबरोबर तो एक चपळ फिल्डर म्हणून देखील ओळखला जातो. शुक्रवारी चेन्नई सुपर किंग्स विरुद्धच्या मॅचमध्ये  (RCB vs CSK) विराटच्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू टीमचा पराभव झाला. या पराभवातही विराटनं त्याच्या खेळानं सर्वांची मनं जिंकली. त्यानं पहिल्यांदा आक्रमक बॅटींग करत अर्धशतक झळकावलं. त्यानंतर एक जबरदस्त कॅच देखील घेतला. विराटनं सुपरमॅनच्या स्टाईलनं घेतलेला हा कॅच सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. आरसीबीच्या कॅप्टननं या आयपीएलमध्ये जोरदार फॉर्ममध्ये असलेला चेन्नईचा बॅट्समन ऋतुराज गायकवाडचा (Ruturaj Gaikwad) अफलातून कॅच घेतला. विराटचा हा कॅच पाहून सर्वजण थक्क झाले. ऋतुराजला देखील आपण आऊच झालो यावर क्षणभर विश्वास बसला नाही. बंगळुरूनं चेन्नईसमोर विजयासाठी 157 रनचं लक्ष्य ठेवलं होतं. सीएसकेला ऋतुराज गायकवाड आणि फाफ ड्यू प्लेसी यांनी जोरदार सुरूवात करुन दिली. या दोघांनी पहिल्या विकेटसाठी 171 रनची पार्टनरशिप केली. ही जमलेली जोडी फोडण्यात कोहलीनं निर्णायक भूमिका बजावली. युजवेंद्र चहलच्या बॉलिंगवर बॅकवर्ड पॉईंटला फिल्डिंग करत असलेल्या विराटनं हवेत झेपावत हा कॅच पकडला. आरसीबीचा लीगच्या सेकंड हाफमधील हा सलग दुसरा पराभव आहे. यापूर्वी कोलकाता नाईट रायडर्सनं त्यांचा 9 विकेट्सनं पराभव केला होता. या पराभवानंतर कॅप्टन विराट कोहली नाराज झाला आहे. त्यानं खराब बॉलिंगमुळे हा पराभव झाल्याचं मॅचनंतर सांगितलं. धोनीच्या मास्टरस्ट्रोकमुळे मिळाली कोहलीची विकेट, 'त्या' सल्ल्यानंतर बदललं मॅचचं चित्र विराट मॅचनंतर म्हणाला की, 'पिच स्लो झाले होते. पण, माझ्या मते किमान 15 ते 20 रन कमी झाले. 175 रन जिंकण्यासाठी आवश्यक होते. त्याचबरोबर नंतर बॉलिंग देखील चांगली झाली नाही. आम्ही आवश्यकतेनुसार बॉलिंग करु शकलो नाही. वास्तविक सेकंड इनिंगमध्ये बॉलर्सना  पिचची मदत मिळत होती. मात्र आम्ही त्याचा वापर करु शकलो नाही. आमच्या बॉलर्सनी सहज रन दिले.' RESULT DATA:
   चेन्नईच्या बॉलर्सनी शेवटच्या ओव्हर्समध्ये यॉर्करचा चांगला वापर केला. त्यामुळे आम्हाला हवाई शॉट्स खेळणे अवघड झाले होते. आम्ही फक्त खराब बॉलवर फटकेबाजी करु शकलो. पण आमच्या बॉलर्सनी बरेच खराब बॉल टाकले. त्यांना फटकेबाजी करु न देण्याचं आमचं धोरण होतं, पण आम्ही तसं करु शकलो नाही,' असे विराट यावेळी म्हणाला.
  Published by:News18 Desk
  First published:

  Tags: IPL 2021, Video Viral On Social Media, Virat kohli

  पुढील बातम्या