Home /News /sport /

IPL 2021, RCB vs CSK: धोनीच्या मास्टरस्ट्रोकमुळे मिळाली कोहलीची विकेट, 'त्या' सल्ल्यानंतर बदललं मॅचचं चित्र

IPL 2021, RCB vs CSK: धोनीच्या मास्टरस्ट्रोकमुळे मिळाली कोहलीची विकेट, 'त्या' सल्ल्यानंतर बदललं मॅचचं चित्र

चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध झालेल्या मॅचमध्ये (RCB vs CSK) विराट मोठी इनिंग करणार असा सर्वांचा अंदाज होता. पण ड्वेन ब्राव्होनं (Dwayne Bravo) विराटला आऊट केलं. विराटच्या या विकेटचं श्रेय चेन्नईचा कॅप्टन महेंद्रसिंह धोनीला (MS Dhoni) आहे.

पुढे वाचा ...
    मुंबई, 25 सप्टेंबर : विराट कोहली (Virat Kohli) मैदानात सेट झाल्यानंतर त्याला आऊट करणे हे सहजासहजी कुणाला जमत नाही. शुक्रवारी चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध झालेल्या मॅचमध्ये (RCB vs CSK) विराटनं दमदार अर्धशतक झळकावलं होतं. त्यावेळी विराट आता मोठी इनिंग करणार असा सर्वांचा अंदाज होता. पण ड्वेन ब्राव्होनं (Dwayne Bravo) विराटला आऊट केलं. विराटच्या या विकेटचं श्रेय चेन्नईचा कॅप्टन महेंद्रसिंह धोनीला (MS Dhoni) आहे. शुक्रवारी मॅच संपल्यानंतर बोलताना धोनीनं स्वत: याचा खुलासा केला आहे. 'ब्राव्हो फिट असून तो चांगली बॉलिंग करत आहे, ही चांगली गोष्ट आहे. मी त्याला भाऊ मानतो. त्यानं स्लो बॉल टाकायला हवा का? याबाबत आमच्यात अनेकदा वाद होतो. पण, ब्राव्हो अनेकदा तशी बॉलिंग करतो हे सर्वांना माहिती आहे. त्यामुळे मी विराट कोहलीच्या विरुद्ध त्याला 6 बॉल 6 पद्धतीनं टाकण्यास सांगितले. त्यानंतर जे झालं ते सर्वांना माहिती आहे.' RCB vs CSK: सलग दुसऱ्या पराभवानंतर विराट नाराज, टीमच्या अपयशाचं सांगितलं कारण जडेजाचा स्पेल निर्णायक धोनीनं पुढं सांगितलं की, ' आम्ही ड्यू मुळे काळजीत होतो. मागच्या सिझनमध्ये त्याचा अनुभव घेतला होता. आरसीबीनं जोरदार सुरूवात केली होती. आठव्या किंवा नवव्या ओव्हरनंतर पिच थोडं स्लो झालं. पडिक्कल एका बाजूनं बॅटींग करत होता. त्यावेळी जडेजानं (Ravindra Jadeja) निर्णायक स्पेल टाकला. मी ड्रिंक्सच्या वेळी मोईनला बॉलिंगसाठी तयार राहण्यास सांगितले होते, पण नंतर मी मन बदललं आणि ब्राव्होला बॉलिंग दिली. कारण त्याला जितकं उशीरा आणलं असतं तितकं आम्हाला अवघड झालं असतं. आमची ही चाल यशस्वी ठरली.' तीन विकेट्स घेणाऱ्या ब्राव्होची 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्कारासाठी निवड करण्यात आली. त्यावेळी त्यानं सांगितलं की, 'आयपीएल सर्वात अवघड स्पर्धा आहे. एखाद्या दिवशी तुमची चाल फसते. माझ्यासाठी विराटची विकेट खूप महत्त्वाची होती. बॉल सरळ टाकण्याचा माझा उद्देश होता. मी नेटमध्ये स्लो बॉलसह वेगवेगळ्या बॉलचाही अभ्यास करतो. त्याचा मला फायदा झाला. POINTS TABLE: सीएसके ऑन टॉप या विजयानंतर सीएसकेची टीम नेट रन रेटच्या आधारावर पॉईंट्स टेबलमध्ये टॉपवर पोहचली आहे. आरसीबीची डोकेदुखी या पराभवानं वाढली आहे. त्यांचे आणि अन्य टीममधील अंतर कमी झाले आहे. त्यामुळे विराटच्या टीमला लवकरात लवकर विजय मिळवणे आवश्यक आहे.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: IPL 2021, MS Dhoni, Virat kohli

    पुढील बातम्या