Home /News /sport /

IPL 2021: टीकेनंतरही पृथ्वी शॉ नं केलं बॉसचं स्वागत, पॉन्टिंगची केली 'चक दे' मधील शाहरुखशी तुलना

IPL 2021: टीकेनंतरही पृथ्वी शॉ नं केलं बॉसचं स्वागत, पॉन्टिंगची केली 'चक दे' मधील शाहरुखशी तुलना

पृथ्वी शॉ (Prithvi Shaw) म्हणाला की, पृथ्वी " मला असं वाटतं की जेव्हा रिकी सर (Ricky Ponting) बोलत असतील त्यावेळी बॅक ग्राऊंडमध्ये शाहरुख खानच्या 'चक दे' सिनेमाचं गाणं वाजलं पाहिजे.

    मुंबई, 7 एप्रिल : दिल्ली कॅपिटल्सचा (Delhi Capitals) मुख्य प्रशिक्षक रिकी पॉन्टिंग (Ricky Ponting) याने पृथ्वी शॉ (Prithvi Shaw) बद्दल एक वक्तव्य केलं होतं. मागच्या आयपीएल सिझनमध्ये (IPL 2020) पृथ्वीचा खडतर काळ सुरु होता. त्यावेळी पृथ्वीनं नेट्समध्ये बॅटींग करण्यास नकार दिला होता, असा दावा पॉन्टिंगनं केला होता. त्याचबरोबर या सिझनमध्ये पृथ्वीनं ही सवय बदलावी अशी सूचना केली होती. पृथ्वी शॉ ने  या टीकेनंतरही रिकी पॉन्टिंगचं स्वागत केलं आहे. त्याचबरोबर एक प्रशिक्षक म्हणून त्यानं पॉन्टिंगची जोरदार प्रशंसा केली आहे. दिल्ली कॅपिटल्सनं पृथ्वीचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्यामध्ये तो म्हणतो, ''बॉस परत आले आहेत. ते एक चांगले व्यक्ती आहे. मैदानात ते बॉससारखे असतात. मैदानाच्या बाहेर एका मित्रासारखे वाटतात. मला वाटतं कि ते खूप चांगले व्यक्ती आहे. हे वर्ष कसं जातंय ते पाहूया. पृथ्वी पुढं म्हणाला," मला असं वाटतं कि जेव्हा रिकी सर बोलत असतील त्यावेळी बॅक ग्राऊंडमध्ये शाहरुख खानच्या 'चक दे' सिनेमाचं गाणं वाजलं पाहिजे.'' रिकी पॉन्टिंग गेल्या काही वर्षांपासून दिल्ली कॅपिटल्सचा कोच आहे. दिल्लीच्या काही खेळाडूंनी यापूर्वीच त्याची प्रशंसा केली आहे. आता पॉन्टिंगच्या फॅन लिस्टमध्ये पृथ्वी शॉ चं नाव देखील वाढलं आहे. पृथ्वी शॉ मागील आयपीलमध्ये बेस्ट फॉर्ममध्ये नव्हता.  त्यानं 13 मॅचमध्ये 228 रन काढले होते. खराब ऑस्ट्रेलियामध्ये झालेल्या कसोटी मालिकेच्या दरम्यानही टीम इंडियातून वगळण्यात आले होते. त्यानंतर त्याने विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत जबरदस्त खेळ करत सर्वात जास्त रन काढले. ( वाचापैसे नसल्याने क्रिकेटचं प्रशिक्षण सोडलं, पण आयपीएलमुळे झाला करोडपती ) रिकी पॉन्टिंगनं " क्रिकेट डॉट कॉम डॉट एयू' ला दिलेल्या मुलाखतीमध्ये सांगितले होते की, 'मागच्या वर्षी पृथ्वी शॉ चं एक अजब धोरण होतं. तो खराब फॉर्ममध्ये असताना बिलकूल बॅटींग करत नसे. तर फॉर्ममध्ये असताना त्याला सतत बॅटींग हवी असायची.''
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Cricket news, Delhi capitals, IPL 2020, Prithvi Shaw, Sports, Srk

    पुढील बातम्या