मुंबई, 15 सप्टेंबर : आयपीएल 2021 च्या दुसऱ्या टप्प्यासाठी (IPL 2021) चेन्नई सुपर किंग्सची (CSK) टीम यूएईमध्ये जोरदार तयारी करत आहे. चेन्नईची टीम सध्या पॉईंट टेबलमध्ये दुसऱ्या क्रमांकावर असून विजेतेपदाची प्रबळ दावेदार आहे. महेंद्रसिंह धोनीच्या (MS Dhoni) नेतृत्त्वाखालील या टीमनं आजवर तीनवेळा आयपीएल स्पर्धेचं विजेतेपद मिळवले असून ही टीम स्पर्धेच्या इतिहासातील यशस्वी टीम आहे.
चेन्नईला महेंद्रसिंह धोनीचा उत्तराधिकारी लवकरात लवकर शोधणे आवश्यक आहे, हे सत्य आहे. टीमचा ऑल राऊंडर रविंद्र जडेजानं (Ravindra Jadeja) धोनीनंतर चेन्नईचा कॅप्टन होण्याची इच्छा व्यक्त केली आहे. जडेजानं ट्विटरवर एक कमेंट करत ही इच्छा व्यक्त केली. जडेजानं नंतर हे ट्विट डिलिट केले. पण चेन्नईच्या फॅन्सनी या ट्विटचा स्क्रीनशॉट घेतला होता. तो आता व्हायरल (Viral) होत आहे.
'महेंद्रसिंह धोनीनंतर चेन्नई सुपर किंग्सचा कॅप्टन म्हणून तुम्ही कुणाची निवड कराल?' असा प्रश्न सीएसके फॅन्स आर्मीनं ट्विटरवर विचारला होता. त्यावर जडेजानं प्रतिक्रिया दिली होती. जडेजानं याला उत्तर देताना 8 हा नंबर लिहिला होता. विशेष म्हणजे जडेजाच्या जर्सीचा नंबर 8 आहे. जडेजाच्या या उत्तरामुळे त्याला धोनीनंतर सीएसकेचा कॅप्टन होण्याची इच्छा आहे, हे स्पष्ट झालं आहे.
'अनुष्कामुळे हे काम करण्यास प्रेरणा मिळाली,' विराट कोहलीनं केली पत्नीची प्रशंसा
IPL 2021 मधील जडेजाची कामगिरी
आयपीएल स्पर्धेच्या पहिल्या टप्प्यात रविंद्र जडेजा जबरदस्त फॉर्मात होता. त्यानं 7 मॅचमध्ये 131 च्या सरासरीनं 131 रन काढले आहेत. तसंच 6.70 च्या इकॉनमी रेटनं 6 विकेट्स घेतल्या आहेत. जडेजानं आयपीएल करिअरमध्ये 191 मॅचमध्ये 2290 रन काढले असून त्याची बॅटींगमधील सरासरी 26.62 आहे. त्याचबरोबर त्यानं 120 विकेट्सही घेतल्या आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Cricket news, Csk, Ravindra jadeja