चेन्नई, 1 मे : टीम इंडियाचा ऑफ स्पिनर रविचंद्रन अश्विन (Ravichandran Ashwin) याच्या घरातील 10 जणांना कोरोनाची (Covid 19) लागण झाली आहे. अश्विनची पत्नी प्रीती नारायण (Prithi Narayan) हिनं याबाबतची माहिती दिली आहे. दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) टीमचा सदस्य असलेल्या अश्विननं कोरोनाशी लढणाऱ्या परिवाराला मदत करण्यासाठी आयपीएलमधून माघार घेतली आहे. प्रितीनं ट्विट करुन घरातील परिस्थितीची सविस्तर माहिती दिली आहे.
"मागच्या आठवडाभरात घरातील 6 मोठ्या आणि 4 लहान व्यक्ती कोरोना पॉझिटीव्ह आढळले आहेत. हे सर्व जण वेगवेगळ्या हॉस्पिटलमध्ये अॅडमिट होते. मागचा आठवडा हे एक वाईट स्वप्न होतं. आमच्या तीन पालकांपैकी एक जण आता घरी परतले आहेत. सर्वांनी लसीकरण करुन घ्या. तुमचं आणि तुमच्या परिवाराचं या महामारीपासून संरक्षण करा." असं प्रितीनं सांगितलं आहे.
Take the vaccine. Give yourselves and your family the best chance to fight this.
— Wear a mask. Take your vaccine. (@prithinarayanan) April 30, 2021
प्रिती पुढे म्हणाली की, " मानसिकरित्या बरं होण्यापेक्षा शारीरिकरित्या बरं होनं सर्वात सोपं आहे. मागच्या आठवड्यातील तीन दिवस सर्वात खराब होते. प्रत्येक जण मदत करण्यासाठी तयार होतं. पण, जवळ कुणीच नव्हतं. हा आजार तुम्हाला अगदी एकटा पाडतो." या शब्दात प्रितीनं घरातील परिस्थितीचं वर्णन केलं आहे.
I guess physical health will recover faster than mental health. Days 5-8 were the absolute worst for me. Everybody was there, offering help yet there's no one with you. Most isolating disease. Please do reach out and seek help.
— Wear a mask. Take your vaccine. (@prithinarayanan) April 30, 2021
IPL 2021 : कोरोना संकटात शिखर धवनची Mission Oxygen ला मोठी मदत
यापूर्वी सनरायझर्स हैदराबाद (SRH) विरुद्धची मॅच झाल्यानंतर अश्विननं आपीएलमधून माघार घेण्याची घोषणा केली होती. कुटुंबातील काही जणांना कोरोनाची (R. Ashwin Family infected with corona virus) बाधा झाली असल्याची माहितीही त्याने यावेळी दिली आहे. अश्विनने ट्विटमध्ये म्हटलं की, मी आयपीएलमधून माघार घेत आहे. माझं कुटुंब सध्या कोविड 19 विषाणूशी झगडा करत आहे. त्यामुळे या कठीण काळात मला त्यांच्यासोबत राहणं आवश्यक आहे. सर्व गोष्टी पहिल्यासारख्या झाल्या तर मी पुन्हा आयपीएल खेळेल असं अश्विननं स्पष्ट केलं होतं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Coronavirus, IPL 2021, R ashwin