Home /News /sport /

IPL 2021: राजस्थानच्या अडचणीत भर, जबरदस्त फॉर्मातील 'सिक्सर किंग' जखमी

IPL 2021: राजस्थानच्या अडचणीत भर, जबरदस्त फॉर्मातील 'सिक्सर किंग' जखमी

आयपीएल स्पर्धेचा (IPL 2021) दुसरा टप्पा तोंडावर आलेला असताना राजस्थान रॉयल्सच्या (Rajasthan Roylas) अडचणी अजूनही संपलेल्या नाहीत.

    मुंबई, 16 सप्टेंबर: आयपीएल स्पर्धेचा (IPL 2021) दुसरा टप्पा तोंडावर आलेला असताना राजस्थान रॉयल्सच्या (Rajasthan Roylas) अडचणी अजूनही संपलेल्या नाहीत. या स्पर्धेपूर्वी जोस बटलरनं (Jos Buttler) वैयक्तिक कारणामुळे माघार घेकली होती. त्यानंतर त्याच्या जागी टीममध्ये समावेश करण्यात आलेला एविन लुईस देखील जखमी (Evin Lewis injured) झाला आहे. तो कॅरेबियन प्रीमियर लीगच्या फायनलमध्ये दुखापतग्रस्त झाला आहे. सेंट लुसिया विरुद्धच्या मॅचमध्ये फोर वाचवण्याच्या नादात त्यांचा खांदा दुखापतग्रस्त झाला आहे. सेंट लुसियाच्या इनिंगमधील पाचव्या ओव्हरमध्ये ही घटना घडली. डॉमिनिक ड्रेक्सच्या बॉलिंगवर रहकीम कॉर्नवॉलनं मारलेला बॉल अडवण्याच्या नादात लुईस जखमी झाला. त्यामुळे तातडीनं फिजियोला मैदानात बोलवण्यात आले. त्यांनी मैदानातच लुईसवर उपचार केले. मात्र त्यानंतर थोड्यावेळाने तो मैदानाच्या बाहेर गेला. त्यानंतर लुईस बॅटींगला उतरला. पण फक्त 6 रन काढून आऊट झाला. राजस्थानला धक्का लुईसची दुखापत गंभीर असेल तर तो राजस्थान रॉयल्ससाठी मोठा धक्का असणार आहे. कारण यापूर्वी बेन स्टोक्स, जोफ्रा आर्चर, जोस बटलर या महत्त्वाच्या खेळाडूंनी स्पर्धेतून माघार घेतल्यानं राजस्थान अडचणीत आहे. लुईस सध्या जबरदस्त फॉर्मात आहे. नुकत्याच संपलेल्या सीपीएल स्पर्धेत सर्वाधिक रन बनवणाऱ्या खेळाडूंच्या यादीत तो दुसऱ्या क्रमांकावर होता. Ashes सीरिज संकटात, इंग्लंडचे दिग्गज खेळाडू बहिष्कार टाकण्याच्या तयारीत त्यानं 11 मॅचमध्ये 47.33 च्या सरासरीनं 426 रन काढले आहेत. त्याचबरोबर सीपीएल 2021 मध्ये सर्वाधिक 38 सिक्स देखील लगावले. त्यानं या स्पर्धेत 3 अर्धशतक आणि 1 शतक झळकावले असून त्याचा स्ट्राईक रेट 163 पेक्षा जास्त आहे.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Cricket news, IPL 2021, Rajasthan Royals

    पुढील बातम्या