मुंबई, 27 ऑक्टोबर: आयपीएल 2021 (IPL 2021) पूर्वी झालेल्या लिलावात सर्वांचे अंदाज चुकवून दक्षिण आफ्रिकेचा ख्रिस मॉरीस (Chris Morris) सर्वात महागडा खेळाडू ठरला होता. त्याला राजस्थान रॉयल्सनं (Rajasthan Royals) 16 कोटी 25 लाखांना खरेदी केले होते. आजवरच्या आयपीएल लिलावात (IPL Auction) कोणत्याही खेळाडूवर लावण्यात आलेली ही सर्वात जास्त बोली आहे. आयपीएलमध्ये 'कोटींची उड्डाणे' घेणाऱ्या ख्रिस मॉरीसनं (Chris Morris) दक्षिण आफ्रिकेच्या टीममधून अनधिकृत निवृत्ती घेतली आहे.
मॉरीसनं 'स्पोर्ट्स क्रीडा' शी बोलताना आपले दक्षिण आफ्रिकेकडून क्रिकेट खेळण्याचे दिवस संपल्याचं मान्य केलं. 'माझी त्यांच्याशी खूप दिवसांपूर्वी चर्चा झाली आहे. फाफ डु प्लेसी, इम्रान ताहीर यांच्याशी त्यांनी ज्या पद्धतीनं वर्तन केलं त्याचं उत्तर अजून दिलेलं नाही. माझी या विषयावर काहीही बोलण्याची इच्छा नाही. माझी त्यांच्याबरोबर एक वर्षांपासून कोणतीही बातचित झालेली नाही. त्यामुळे नेमकं काय सुरू आहे, यावर मी काही सांगू शकत नाही.
दक्षिण आफ्रिकेकडून खेळण्याचे माझे दिवस संपले आहेत. मी कोणतीही घोषणा केलेली नाही. तसंच अधिकृतपणे निवृत्त झालेलो नाही. त्यांना माहितीय मी कुठे आहे. माझे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील दिवस संपले आहेत. आता मी देशांतर्गत क्रिकेटवर लक्ष केंद्रीत करणार आहे. त्या ठिकाणी टीमला जिंकण्यासाठी प्रयत्न करेन. दक्षिण आफ्रिकेकडून तीन्ही प्रकारचे क्रिकेट खेळणे ही अभिमानाची बाब आहे. मला काही महिन्यांपूर्वी या विषयावर विचारलं असतं तर मी यावर मोठं उत्तर दिलं असतं. आता मी माझ्या करिअरवर समाधानी आहे.' असं मॉरीसनं स्पष्ट केलं.
T20 World Cup: पाकिस्ताननं केली टीम इंडियाची मदत, सेमी फायनलचा मार्ग झाला सोपा
ख्रिस मॉरीसनं 4 टेस्ट, 42 वन-डे आणि 23 आंतरराष्ट्रीय टी20 मॅचमध्ये आफ्रिकेचं प्रतिनिधित्व केलं आहे. त्यामध्ये त्यानं अनुक्रमे 12, 48 आणि 34 विकेट्स घेतल्या आहेत. सध्या सुरू असलेल्या टी20 वर्ल्ड कपमधील दक्षिण आफ्रिकेच्या टीममध्ये त्याची निवड करण्यात आलेली नाही.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Chris morris, IPL 2021, South africa