मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

IPL 2021, DC vs CSK: धोनीची फटकेबाजी पाहून साक्षीला अश्रू अनावर! पाहा VIDEO

IPL 2021, DC vs CSK: धोनीची फटकेबाजी पाहून साक्षीला अश्रू अनावर! पाहा VIDEO

चेन्नई सुपर किंग्सचा (Chennai Super Kings) कॅप्टन महेंद्रसिंह धोनीनं (MS Dhoni) दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) विरुद्ध 6 बॉलमध्ये नाबाद 18 रनची खेळी केली. त्याची फटकेबाजी पाहून धोनीची पत्नी साक्षीला (Sakshi Dhoni) अश्रू अनावर झाले.

पुढे वाचा ...
  • Published by:  News18 Desk

दुबई, 11 ऑक्टोबर:  चेन्नई सुपर किंग्सचा (Chennai Super Kings) कॅप्टन महेंद्रसिंह धोनीनं (MS Dhoni) दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) विरुद्ध 6 बॉलमध्ये नाबाद 18 रनची खेळी केली. त्यानं शेवटच्या ओव्हरमध्ये केलेल्या फटकेबाजीमुळे सीएसकेनं (CSK) आयपीएल फायनलमध्ये (IPL 2021 Final) प्रवेश केला. रविवारी झालेल्या मॅचमध्ये बऱ्याच दिवसांनी धोनीची जुनी फटकेबाजी पाहयला मिळाली. त्याची फटकेबाजी पाहून धोनीची पत्नी साक्षीला (Sakshi Dhoni) अश्रू अनावर झाले.

धोनीची फटकेबाजी पाहताना फॅन्सच्या उत्साहाला उधाण आले होते. त्याचवेळी प्रेक्षकांमध्ये उपस्थित असलेली साक्षी चांगलीच भावुक झाली होती. माहीची ही खेळी पाहून साक्षी देखील खूश झाली होती. तिनं यावेळी तिची मुलगी झिवाला (Ziva Dhoni) मिठी मारत याचा आनंद साजरा केला. या आयपीएल स्पर्धेत संथ खेळीबद्दल धोनीवर सातत्यानं टीका होत होती. त्या परिस्थितीमध्ये धोनीनं फटकेबाजी करत चेन्नईला फायनलमध्ये नेल्यानं साक्षीला अश्रू आवरता आले नाहीत.

आयपीएल 2021 च्या पहिल्या क्वालिफायरमध्ये दिल्ली कॅपिटल्सने चेन्नई सुपर किंग्सला (CSK vs DC) विजयासाठी 173 रनचं आव्हान दिलं होतं. दिल्लीचा ओपनर पृथ्वी शॉने (Prithvi Shaw) 34 बॉलमध्ये 60 रन केले, यामध्ये 7 फोर आणि 3 सिक्सचा समावेश होता, तर कर्णधार ऋषभ पंतने (Rishabh Pant) 35 बॉलमध्ये नाबाद 51 रन केले. शिमरन हेटमायरनेही 37 रनची महत्त्वाची खेळी केली. चेन्नईकडून जॉश हेजलवूडला सर्वाधिक 2 विकेट मिळाल्या, तर रवींद्र जडेजा, मोईन अली आणि ड्वॅन ब्राव्होला प्रत्येकी 1-1 विकेट घेण्यात यश आलं.

दुबईत दिसले माहीचे मॅजिक, धोनीनं विजय मिळवून देताच फॅन्स इमोशनल!

दिल्लीने दिलेल्या 173 रनच्या आव्हानाचा पाठलाग करताना चेन्नईची सुरुवात खराब झाली. फॉर्ममध्ये असलेला फाफ डुप्लेसिस फक्त 1 रन करून आऊट झाला, पण ऋतुराज गायकवाडने एका बाजूने किल्ला लढवला. ऋतुराजने 50 बॉलमध्ये 70 रनची खेळी केली, तर रॉबिन उथप्पाने 44 बॉलमध्ये 63 रन केले. दिल्लीकडून टॉम करनने सर्वाधिक 3 विकेट घेतल्या,

First published:

Tags: Csk, IPL 2021, MS Dhoni, Sakshi dhoni