Home /News /sport /

VIDEO: IPL पूर्वी अनिल कुंबळेचा दिसला हटके अवतार! रोमँटीक गाणं गात गाजवली मैफील

VIDEO: IPL पूर्वी अनिल कुंबळेचा दिसला हटके अवतार! रोमँटीक गाणं गात गाजवली मैफील

आयपीएलचा दुसरा टप्पा (IPL 2021, Second Phase) 19 तारखेपासून यूएईमध्ये सुरू होत आहे. हा टप्पा सुरु होण्यापूर्वी खेळाडूंना फ्रेश करण्यासाठी पंजाब किंग्सच्या (PBKS) मॅनेजमेंटनं विशेष कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं.

  दुबई, 15 सप्टेंबर : आयपीएल स्पर्धेचा पहिला टप्पा (IPL 2021, First Phase) पंजाब किंग्ससाठी (PBKS) फारसा चांगला गेलेला नाही. टीमनं आत्तापर्यंत 8 पैकी फक्त 3 मॅच जिंकल्या आहेत. पॉईंट टेबलमध्ये 6 व्या क्रमांकावर असलेल्या पंजाबला अजूनही 'प्ले ऑफ' गाठण्याची आशा आहे. आता आयपीएलचा दुसरा टप्पा (IPL 2021, Second Phase) 19 तारखेपासून यूएईमध्ये सुरू होत आहे. या टप्प्यासाठी पंजाबची टीम सध्या जोरदार मेहनत घेत आहे. हा टप्पा सुरु होण्यापूर्वी खेळाडूंना फ्रेश करण्यासाठी पंजाब किंग्सच्या मॅनेजमेंटनं विशेष कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. टीम इंडियाचा माजी कॅप्टन आणि पंजाब किंग्सचा हेड कोच अनिल कुंबळेनं (Anil Kumble) हा खास कार्यक्रम गाजवला. मैदानात नेहमी गंभीर वर्तनासाठी प्रसिद्ध असलेल्या कुंबळेनं या कार्यक्रमात रोमँटीक हिंदी गाणं गात सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. पंजाबचा बॅटींग कोच वासिम जाफरनं (Wasim Jaffer) देखील यावेळी त्याला साथ दिली. कुंबळे-जाफर जोडीनं 'कभी अलविदा ना कहना..' हे गाणं गायलं. त्यांच्या गाण्याचा व्हिडीओ पंजाब किंग्जनं त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. अनिल कुंबळेनं खास शैलीमध्ये गायलेलं हे गाणं क्रिकेट फॅन्समध्ये चांगलंच व्हायरल  झालं आहे.
  CPL 2021: विराटच्या साथीदाराची कमाल, शाहरुख खानची टीम सेमी फायनलमध्ये पराभूत आयपीएल स्पर्धेचा दुसरा टप्पा मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स (Mumbai Indians vs Chennai Super Kings) या मॅचनं 19 सप्टेंबर रोजी सुरु होणार आहे. पंजाब किंग्सची पहिली लढत 21 सप्टेंबर रोजी राजस्थान रॉयल्सशी होणार आहे.
  Published by:News18 Desk
  First published:

  Tags: Cricket news, IPL 2021, Punjab kings

  पुढील बातम्या