Home /News /sport /

CPL 2021: विराटच्या साथीदाराची कमाल, शाहरुख खानची टीम सेमी फायनलमध्ये पराभूत

CPL 2021: विराटच्या साथीदाराची कमाल, शाहरुख खानची टीम सेमी फायनलमध्ये पराभूत

आयपीएल स्पर्धा सुरु होण्यापूर्वी (IPL 2021) विराट कोहली (Virat Kohli) आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुसाठी (RCB) गुड न्यूज आहे.

    मुंबई, 15 सप्टेंबर : आयपीएल स्पर्धा सुरु होण्यापूर्वी (IPL 2021) विराट कोहली (Virat Kohli) आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुसाठी (RCB) गुड न्यूज आहे. आरसीबीनं आयपीएलच्या उत्तरार्धासाठी करारबद्ध केलेला टीम डेव्हिड (Tim David) हा बॅट्समन सध्या जबरदस्त फॉर्मात आहे. त्यानं शेवटच्या ओव्हरमध्ये केलेल्या आक्रमक बॅटींगमुळे शाहरुख खानची (Shah Rukh Khan) ट्रिनबॅगो नाईट रायडर्स (TKR) टीम कॅरेबीयन प्रीमियर लीगच्या (CPL 2021) सेमी फायनलमध्ये पराभूत झाली. सेंट लुसिया किंग्स विरुद्ध ट्रिनबागो नाईट रायडर्स  (Trinbago Knight Riders vs Saint Lucia Kings, 1st Semi final) यांच्यात झालेल्या या सेमी फायनलमध्ये सेंट लुसियानं 21 रननं विजय मिळवला. सीपीएल स्पर्धेच्या मागील सिझनमध्ये नाईट रायडर्सनं त्यांचा फायनलमध्ये पराभव केला होता. या पराभवाचा बदला घेण्यासाठी टीम डेव्हिडची इनिंग महत्त्वाची ठरली. त्यानं शेवटच्या टप्प्यात 17 बॉलमध्ये 4 सिक्स आणि 1 फोरच्या मदतीनं 38 रन काढले. डेव्हिडच्या फटकेबाजीमुळे सेंट लुसियानं पहिल्यांदा बॅटींग करत 20 ओव्हर्समध्ये 4 आऊट 205 रन केले. कायरन पोलार्डच्या (Kieron Pollard) नाईट रायडर्सना हे आव्हान पेलवलं नाही. त्यांची टीम 19. 3 ओव्हर्समध्ये 184 रनवर ऑल आऊट झाली. टीम डेव्हिडच्या ऑल राऊंड खेळीबरोबरच डेव्हिड विसेचा (David Wiese) ऑल राऊंड खेळ सेंट लुसियाच्या विजयात निर्णायक ठरला. IPL 2021 : पोलार्ड-डिकॉक खेळणार का नाही? मुंबईसाठी सगळ्यात मोठी Update विसेनं पहिल्यांदा बॅटींग करताना 21 बॉलमध्ये नाबाद 34 रनची खेळी केली. नंतर 4 ओव्हर्समध्ये 39 रन देत 5 विकेट्स घेतल्या. नाईट रायडर्सला आक्रमक सुरुवात करुन देणाऱ्या सुनील नरीनला (Sunil Narine) विसेनं आऊट केलं. त्यानंतर कॉलिन मुन्रोलाही आऊट करत नाईट रायडर्सला आणखी अडचणीत आणलं. कॅप्टन पोलार्डकडून नाईट रायडर्सला मोठी अपेक्षा होती. पण तो 13 बॉलमध्ये 26 रन काढून रनरेट वाढवण्याच्या नादात आऊट झाला. पोलार्ड आऊट झाल्यानंतर नाईट रायडर्सच्या तळाच्या बॅट्समननं निराशा केली. त्यामुळे या स्पर्धेचं सलग दुसऱ्यांदा विजेतेपद मिळवण्याचं शाहरुख खानच्या टीमचं स्वप्न भंग झालं.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Cricket news, RCB

    पुढील बातम्या