Home /News /sport /

IPL 2021: पृथ्वी शॉ ने काढले 38 बॉलमध्ये 72 रन! पॉन्टिंगची बोलती बंद

IPL 2021: पृथ्वी शॉ ने काढले 38 बॉलमध्ये 72 रन! पॉन्टिंगची बोलती बंद

आयपीएलच्या स्पर्धेतील (IPL 2021) दुसऱ्या मॅचमध्ये दिल्ली कॅपिटल्सचा ओपनर पृथ्वी शॉ (Prithvi Shaw) याने त्याच्या टीकारांना चोख उत्तर दिलं आहे.

    मुंबई, 11 एप्रिल : आयपीएलच्या स्पर्धेतील (IPL 2021) दुसऱ्या मॅचमध्ये दिल्ली कॅपिटल्सचा ओपनर पृथ्वी शॉ (Prithvi Shaw) याने त्याच्या टीकारांना चोख उत्तर दिलं आहे. पृथ्वीनं फक्त 38 बॉलमध्ये 72 रन काढले. मागच्या आयपीएलमध्ये पृथ्वी फ्लॉप गेला होता. यंदा त्यानं पहिल्याच मॅचमध्ये आपला दर्जा सर्वांना दाखवला आहे. पृथ्वी शॉ याने चेन्नईच्या एकाही बॉलरला सोडलं नाही. त्यानं अगदी सुरुवातीलाच दीपक चहरला (Deepak Chahar) सिक्स लगावत धोनीच्या टीमला इशारा दिला. पाचवी ओव्हर टाकायला आलेला मुंबईकर शार्दुल ठाकुरवरही (Shardul Thakur) पृथ्वी चांगलाच बरसला. त्यानं त्याच्या एकाच ओव्हरमध्ये तीन सलग फोर लगावले. दिल्लीची आक्रमक सुरुवात पृथ्वी शॉनं दिल्ली कॅपिटल्सला आक्रमक सुरुवात दिली. त्यानं शिखर धवनच्या मदतीनं फक्त 28 बॉलमध्ये दिल्लीचे 50 रन पूर्ण केले. दिल्लीनं 'पॉवर प्ले' मध्ये 65 रन करत विजयाचा पाया रचला. पृथ्वीने 7 वी आयपीएल हाफ सेंच्युरी 27 बॉलमध्येच पूर्ण केली. हाफ सेच्युरीनंतरही त्याचा धडाका सुरुच होताय चेन्नईचा अनुभवी बॉलर ड्वेन ब्राव्हो (Dwayne Bravo) याने अखेर पृथ्वीला आऊट केले. आऊट होण्यापूर्वी त्यानं 38 बॉलमध्ये 9 फोर आणि 3 सिक्सच्या मदतीनं 72 रन काढले होते. त्याचा स्ट्राईक रेट हा 190 च्या जवळ होता. त्याच्या खेळीमुळेच दिल्लीच्या विजयाचा पाया रचला. ( 'बेटे शेर हो तुम, मौज कर दी' पहिल्या मॅचनंतर गब्बरनं केलं Prithvi Shaw चं कौतुक, VIDEO ) पॉन्टिंगला दिलं उत्तर चेन्नई सुपर किंग्स विरुद्धच्या या आक्रमक खेळीनं पृथ्वीनं टीकाकारांचं तोंड बंद केलं आहे. मागील आयपीएल सिझन खराब गेल्यानंतर पृथ्वीच्या बॅटींगमधील तंत्रावर प्रश्न विचारले जात होते. दिल्ली कॅपिटल्सचा कोच रिकी पॉन्टिंग (Ricky Ponting) याने देखील ऑस्ट्रेलिया दौऱ्यात पृथ्वीच्या तंत्रावर शंका उपस्थित केली होती. आधी विजय हजारे ट्रॉफी आणि आता आयपीएल 2021 मधील पहिल्याच मॅचमध्ये पृथ्वीनं जबरदस्त बॅटींग केली आहे. त्याची ही बॅटींग पाहून पॉन्टिंगचा गैरसमज आता दूर झाला असेल.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Delhi capitals, IPL 2021, Prithvi Shaw

    पुढील बातम्या