पृथ्वी शॉ- शिखर धवन जोडीनं चेन्नई विरुद्ध पहिल्या विकेटसाठा 138 रनची पार्टरनरशिप केली. धववनं 54 बॉलमध्ये 85 रन काढले. यामध्ये 10 फोर आणि 2 सिक्सचा समावेश आहे. दिल्लीसाठी त्यांच्या ओपनिंग बॅट्समननं 2016 नंतर पहिल्यांचा 100 पेक्षा जास्त रनची पार्टरनरशिप केली आहे. तर दिल्लीच्या दोन्ही ओपनिंग बॅट्समननी हाफ सेंच्युरी झळकावण्याचा योग 2015 नंतर शनिवारी प्रथमच आला. ( वाचा : पहिल्या मॅचमधील पराभवानंतर धोनीला आणखी एक मोठा धक्का! ) आयपीएलच्या मागच्या मोसमात दिल्लीची टीम फायनलपर्यंत पोहोचली होती, पण अंतिम सामन्यात त्यांचा मुंबईकडून पराभव झाला होता. कर्णधार म्हणून ऋषभ पंत याचा हा पहिलाच आयपीएल सामना होता. श्रेयस अय्यरला (Shreyas Iyer) दुखापत झाल्यामुळे पंतकडे दिल्लीचं नेतृत्व देण्यात आलं आहे. दिल्लीची पुढील मॅच आता राजस्थान रॉयल्स (RR) विरुद्ध 15 एप्रिल रोजी होणार आहे.View this post on Instagram
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Delhi capitals, Instagram post, IPL 2021, Prithvi Shaw, Shikhar dhavan