मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /IPL 2021 Points Table: विराटनं केली रोहितची मदत, बंगळुरूच्या विजयानं मुंबईचा मार्ग सोपा

IPL 2021 Points Table: विराटनं केली रोहितची मदत, बंगळुरूच्या विजयानं मुंबईचा मार्ग सोपा

आयपीएल स्पर्धेत (IPL 2021) बुधवारी झालेल्या मॅचमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूनं (Royal Challengers Bangalore) राजस्थान रॉयल्सचा 7 विकेट्सनं पराभव केला.  बंगळुरूच्या या विजयानं पॉईंट्स टेबलमध्ये (IPL 2021 Points Table) मोठे बदल झाले आहेत.

पुढे वाचा ...

मुंबई, 30 सप्टेंबर : आयपीएल स्पर्धेत (IPL 2021) बुधवारी झालेल्या मॅचमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूनं (Royal Challengers Bangalore) राजस्थान रॉयल्सचा 7 विकेट्सनं पराभव केला आहे. दुबई इंटरनॅशनल स्टेडियममध्ये झालेल्या या मॅचमध्ये (RCB vs RR) राजस्थाननं पहिल्यांदा बॅटींग करत 20 ओव्हर्समध्ये 149 रन काढले होते. बंगळुरूनं ते लक्ष्य 17.1 ओव्हरमध्ये 3 विकेट्स गमावून पूर्ण केलं. बंगळुरूच्या या विजयानं पॉईंट्स टेबलमध्ये (IPL 2021 Points Table) मोठे बदल झाले आहेत.

आयपीएल पॉईंट्स टेबलमधील पहिल्या दोन क्रमांकावर काहीही बदल झालेले नाहीत. चेन्नई सुपर किंग्स (CSK) आणि दिल्ली कॅपिटल्स (DC) प्रत्येकी 16 पॉईंट्स आहेत. चेन्नई पहिल्या तर दिल्ली दुसऱ्या क्रमांकावर आहे. तर बंगळुरूनं 11 मॅचमध्ये 7 विजय मिळवत त्यांचा रनरेट सुधारला आहे.

कोलकाता नाईट रायडर्स (KKR) कडून पराभूत झाल्यानंतर बंगळुरूचा रनरेट बराच घसरला होता. पण आता त्यांच्याकडं 14 पॉईंट्स आहेत. तसंच त्यांचा रनरेट -0.200 आहे. या विजयानं बंगळुरुनं पॉईंट्स टेबलमधील तिसरा क्रमांक आणखी मजबूत केला आहे. त्याचबरोबर कोलकाता आणि मुंबई या जवळच्या प्रतिस्पर्धी टीमवर 4 पॉईंट्सची आघाडी मिळवली आहे.

IPL 2021 : मुंबईविरुद्ध हॅट्रिक घेणाऱ्या हर्षल पटेलचा आणखी एक विक्रम, आता 'चॅम्पियन' निशाण्यावर

विराटनं केली रोहितची मदत

आरसीबीच्या विजयानं राजस्थान रॉयल्सच्या ‘प्ले ऑफ’ गाठण्याच्या आशांना धक्का बसला आहे. राजस्थानचे आता 11 मॅचनंतर फक्त 8 पॉईंट्स आहेत. तसंच त्यांचा नेट रनरेट देखील -0.468 इतका घसरला आहे. राजस्थाननं बंगळुरूवर विजय मिळवला असता तर त्यांची टीम पॉईंट टेबलमध्ये पाचव्या क्रमांकावर गेली असती. सध्या तो क्रमांक मुंबई इंडियन्सकडं (MI) आहे. त्याचबरोबर मुंबईची या स्पर्धेतील पुढील वाटचाल आणखी खडतर झाली असती. पण, आता आरसीबीच्या विजयानं मुंबईचा मार्ग सोपा झाला आहे.

POINTS TABLE:

राजस्थानला ‘प्ले ऑफ’ मध्ये प्रवेश करण्यासाठी उर्वरित तीन मॅच मोठ्या अंतरानं जिंकणे आवश्यक आहे. टीमचा फॉर्म पाहता ते अवघड दिसत आहे. आता चौथ्या क्रमांकासाठी मुंबई आणि कोलकातामध्ये मुख्य लढत आहे. पण पंजाब आणि राजस्थान या टीमचं आव्हानही अजून कायम आहे.

First published:

Tags: IPL 2021, Mumbai Indians, RCB