जाहिरात
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / IPL 2021 : मुंबईविरुद्ध हॅट्रिक घेणाऱ्या हर्षल पटेलचा आणखी एक विक्रम, आता 'चॅम्पियन' निशाण्यावर

IPL 2021 : मुंबईविरुद्ध हॅट्रिक घेणाऱ्या हर्षल पटेलचा आणखी एक विक्रम, आता 'चॅम्पियन' निशाण्यावर

IPL 2021 : मुंबईविरुद्ध हॅट्रिक घेणाऱ्या हर्षल पटेलचा आणखी एक विक्रम, आता 'चॅम्पियन' निशाण्यावर

हर्षल पटेलसाठी (Harshal Patel) आयपीएल 2021 (IPL 2021) धमाकेदार राहिलं आहे. आरसीबीकडून खेळताना बुधवारी राजस्थानविरुद्धच्या (RCB vs RR) सामन्यात हर्षल पटेलने 3 विकेट घेतल्या.

  • -MIN READ
  • Last Updated :

दुबई, 29 सप्टेंबर : हर्षल पटेलसाठी (Harshal Patel) आयपीएल 2021 (IPL 2021) धमाकेदार राहिलं आहे. आरसीबीकडून खेळताना बुधवारी राजस्थानविरुद्धच्या (RCB vs RR) सामन्यात हर्षल पटेलने 3 विकेट घेतल्या. या मोसमात हर्षल पटेलने आतापर्यंत 26 विकेट घेतल्या आहेत. आयपीएल इतिहासात आरसीबीकडून एखाद्या बॉलरची ही सर्वोत्तम कामगिरी आहे. याआधी लेग स्पिनर युझवेंद्र चहलने (Yuzvendra Chahal) 2015 साली आरसीबीकडून खेळताना 23 विकेट घेतल्या होत्या. पहिले बॅटिंग करणाऱ्या राजस्थानला 20 ओव्हरमध्ये 9 विकेट गमावून 149 रनच करता आले. हर्षल पटेलने याआधी मुंबई इंडियन्सविरुद्धच्या (RCB vs MI) सामन्यात हॅट्रिक घेतली होती. आरसीबीकडून हॅट्रिक घेणारा तो फक्त तिसरा बॉलर आहे. या मोसमात त्याने 11 सामन्यांमध्ये 13 च्या सरासरीने 26 विकेट घेतल्या. तसंच त्याचा स्ट्राईक रेटही 9 चा आहे. म्हणजेच प्रत्येक 9 व्या बॉलवर तो विकेट घेत आहे. याचसह त्याने एकदा 4 विकेट आणि एकदा 5 विकेट घेण्याचा कारनामाही केला आहे. या सामन्याआधी गुजरातच्या हर्षल पटेलने 106 टी-20 मॅचमध्ये 121 विकेट घेतल्या होत्या. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्येही त्याने 200 पेक्षा अधिक विकेट घेतल्या. ब्राव्होचं रेकॉर्ड निशाण्यावर आयपीएलला 2008 साली सुरुवात झाली. आयपीएलच्या इतिहासात सर्वाधिक 32 विकेट घेण्याचा विक्रम चेन्नईच्या (CSK) ड्वॅन ब्राव्होच्या (Dwayne Bravo) नावावर आहे. 2013 साली ब्राव्होने हा विक्रम केला होता. दिल्लीच्या कागिसो रबाडाने 2020 साली 30 विकेट घेतल्या होत्या. मुंबईच्या लसिथ मलिंगाने 2011 साली 28 विकेट मिळवल्या होत्या. तर 2017 साली भुवनेश्वर कुमारला 26 विकेट घेता आल्या. 2015 साली पुन्हा ब्राव्होनेच 26 विकेट घेतल्या होत्या. 2019 साली इम्रान ताहिरनेही 26 विकेट मिळवल्या होत्या. हर्षल पटेलने एका मोसमात सर्वाधिक विकेट मिळवणारा भारतीय बॉलर म्हणून भुवनेश्वर कुमारच्या विक्रमाशी बरोबरी केली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: IPL 2021 , RCB
  • First Published :
जाहिरात
जाहिरात