मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /IPL 2021: विराटमुळे वाढलं धोनीचं टेन्शन! 3 दिवस ठरणार निर्णायक

IPL 2021: विराटमुळे वाढलं धोनीचं टेन्शन! 3 दिवस ठरणार निर्णायक

विराट कोहलीच्या (Virat Kohli) कॅप्टनसीखाली खेळणाऱ्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुनं (RCB) सलग दुसऱ्या वर्षी आयपीएल प्ले ऑफमध्ये (IPL 2021 Playoff) प्रवेश केला आहे.

विराट कोहलीच्या (Virat Kohli) कॅप्टनसीखाली खेळणाऱ्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुनं (RCB) सलग दुसऱ्या वर्षी आयपीएल प्ले ऑफमध्ये (IPL 2021 Playoff) प्रवेश केला आहे.

विराट कोहलीच्या (Virat Kohli) कॅप्टनसीखाली खेळणाऱ्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुनं (RCB) सलग दुसऱ्या वर्षी आयपीएल प्ले ऑफमध्ये (IPL 2021 Playoff) प्रवेश केला आहे.

मुंबई, 6 ऑक्टोबर : विराट कोहलीच्या (Virat Kohli) कॅप्टनसीखाली खेळणाऱ्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुनं (RCB) सलग दुसऱ्या वर्षी आयपीएल प्ले ऑफमध्ये (IPL 2021 Playoff) प्रवेश केला आहे. आयपीएलच्या 14 व्या सिझनमध्ये आरसीबी सध्या तिसऱ्या क्रमांकावर असून त्यांच्या 2 मॅच बाकी आहेत. आरसीबीचं पुढील लक्ष्य हे टॉप 2 मध्ये प्रवेश करणे हे आहे. आयपीएल पॉईंट टेबलमध्ये दिल्ली कॅपिटल्स (DC) 20 पॉईंट्ससह पहिल्या तर चेन्नई सुपर किंग्स (CSK) 18 पॉईंट्ससह दुसऱ्या क्रमांकावर आहे.

टॉप 2 मध्ये दाखल होण्यासाठी आरसीबीला बुधवारी होणाऱ्या मॅचमध्ये सनरायझर्स हैदराबादचा (RCB vs SRH) मोठा पराभव करणे आवश्यक आहे. आयपीएलच्या या सिझनमध्ये सीएसकचे रनरेट (+0.739) हा सर्वात जास्त आहे. तर तिसऱ्या नंबरवर असूनही आरसीबीचा रनरेट (-0.157) खराब आहे. आता सीएसकेचा पंजाब किंग्ज विरुद्ध पराभव झाला आणि आरसीबीनं पुढील दोन्ही मॅच जिंकल्या तर आरसीबीची टीम 20 पॉईंट्ससह टॉप 2 मध्ये दाखल होईल.

IPL 2021 Playoff: मुंबई इंडियन्सच्या आशा वाढल्या, 'या' पद्धतीनं मिळेल टॉप 4 मध्ये प्रवेश

आयपीएलच्या दुसऱ्या टप्प्यात आरसीबीची सुरुवात खराब झाली. केकेआर आणि चेन्नईकडून त्यांचा पराभव झाला. त्यानंतर टीमनं जोरदार पुनरागमन करत सलग तीन विजय मिळवले आणि प्ले ऑफमध्ये प्रवेश केला. आता पुढील दोन मॅचमध्येही विजयी अभियान कायम राखण्याचा आरसीबीचा प्रयत्न असेल. आरसीबीचा कॅप्टन विराट कोहलीनं अद्याप मोठी धावसंख्या उभारली नसली तरी तो चांगल्या फॉर्ममध्ये आहे. तर ऑल राऊंड ग्लेन मॅक्सवेल (Glenn Maxwell) सध्या फॉर्मात असून त्यानं सलग तीन अर्धशतक झळकावली आहेत.

POINTS TABLE:

टॉप 2 चा फायदा

आयपीएल पॉईंट्स टेबलमध्ये टॉप 2 मध्ये राहण्याचा मोठा फायदा आहे. या टीमचा मुकाबला क्वालिफायर 1 मध्ये होतो. ही मॅच जिंकणारी टीम थेट फायनलमध्ये जाते. तर पराभूत झालेल्या टीमला आणखी एक संधी मिळते. एलिमेनेटर 3 आणि एलिमेनेटर 4 मध्ये प्ले ऑफ मधील दुसरी लढत होते. ही लढत जिंकणाऱ्या टीमला क्वालिफायर 1 मध्ये पराभूत झालेल्या टीमविरुद्ध खेळावं लागतं. टॉप 2 मध्ये राहणाऱ्यांना फायनलमध्ये प्रवेश करण्यासाठी एक अतिरिक्त संधी मिळते. त्यामुळे याचं मोठं महत्त्व आहे.

First published:
top videos

    Tags: IPL 2021, MS Dhoni, Virat kohli