मुंबई, 26 एप्रिल : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स (RCB vs CSK) ही रविवारी झालेली मॅच रवींद्र जडेजाच्या (Ravindra Jadeja) फटकेबाजीमुळे गाजली. जडेजानं हर्षल पटेलच्या (Harshal Patel) एकाच ओव्हरमध्ये 37 रन काढले. यामध्ये 4 फोर आणि 1 सिक्सचा समावेश होता. एका ओव्हरमध्ये सर्वात जास्त रन काढण्याच्या आयपीएल विक्रमाची जडेजानं बरोबरी केली. यापूर्वी ख्रिस गेलनं (Chris Gayle) 2013 साली हा विक्रम केला होता. रवींद्र जडेजानं आरसीबी विरुद्ध फक्त 28 बॉलमध्ये नाबाद 62 रन काढले. त्याच्या या फटकेबाजीमुळे आरसीबीचा या आयपीएल सिझनमध्ये पहिला पराभव झाला. मात्र जडेजाच्या या फटकेबाजीला आरसीबीच्या खेळाडूनं केलेली एक मोठी चूक कारणीभूत ठरली आहे. सीएसकेच्या इनिंगमधील 17 व्या ओव्हरमध्ये आरसीबीकडून ही चूक घडली. वॉशिंग्टन सुंदरनं टाकलेल्या पाचव्या बॉलवर जडेजानं फटका लगावला. जडेजानं मारलेला तो फटका डॅन ख्रिस्टीन (Dan Christain) याच्या हातामध्ये आला होता, पण तो त्याला नीट पकडता आला नाही. ख्रिस्टीननं जडेजाचा कॅच सोडला. त्यावेळी जडेजा शून्यावर खेळत होता. जडेजा शून्यावर असतानाच ख्रिस्टीननं मोठी चूक करत त्याला जीवदान दिलं. त्याचा फायदा घेत जडेजानं 20 व्या ओव्हरमध्ये इतिहास घडवला.
आर अश्विनची आयपीएलमधून माघार; Tweet करत सांगितलं कारण चेन्नई सुपर किंग्स विरुद्धच्या मॅचमध्ये विराट कोहलीनं (Virat Kohli) मोठ्या अपेक्षेनं डॅन ख्रिस्टीनचा समावेश केला होता. ख्रिस्टीननं खराब फिल्डिंग करत त्याचा अपेक्षाभंग केला. खराब फिल्डिंगनंतर ख्रिस्टीनमं बॅटींगमध्ये देखील निराशा केली. तो फक्त 1 रन काढून रन आऊट झाला. विशेष म्हणजे रवींद्र जडेजानंच त्याला थेट थ्रो करत रन आऊट केलं. फिल्डिंग आणि बॅटींग या दोन्ही प्रकारात निराशा करणाऱ्या डॅन ख्रिस्टीनला विराट कोहली माफ करुन पुढच्या मॅचमध्ये खेळवणार का? हा प्रश्न आहे.