Home /News /sport /

IPL 2021: आला रे... मुंबई इंडियन्सच्या मराठमोळ्या थीम साँगचा VIDEO पाहिला का?

IPL 2021: आला रे... मुंबई इंडियन्सच्या मराठमोळ्या थीम साँगचा VIDEO पाहिला का?

एक परिवार (One Family) या संकल्पनेमुळे वैशिष्ट्यपूर्ण ओळख निर्माण केलेल्या मुंबई इंडियन्सनं (Mumbai Indians) गणशोत्सवाचे औचित्य साधून क्रिकेट फॅन्ससाठी खास मराठी गाणं प्रदर्शित केलं आहे.

    मुंबई, 16 सप्टेंबर : आयपीएल स्पर्धेचा दुसरा टप्पा (IPL 2021, Phase 2) सुरू होण्यास आता काही दिवसांचाच अवधी उरला आहे. क्रिकेट फॅन्समध्ये आता आयपीएलची उत्सुकता शिगेला पोहचली आहे. यंदा यूएईमध्ये प्रेक्षकांना स्टेडियममध्ये प्रवेश मिळणार असल्यानं त्यांचा आनंद अधिक द्विगुणीत झाला आहे. प्रेक्षकांच्या याच उत्साहात भर घालण्यासाठी गतविजेत्या मुंबई इंडियन्सनं (Mumbai Indians) मराठमोळं थीम साँग प्रदर्शित केलं आहे. एक परिवार (One Family) या संकल्पनेमुळे वैशिष्ट्यपूर्ण ओळख निर्माण केलेल्या मुंबई इंडियन्सनं  गणशोत्सवाचे औचित्य साधून क्रिकेट फॅन्ससाठी खास मराठी गाणं प्रदर्शित केलं आहे. कॅप्टन रोहित शर्मा, हार्दिक पांड्या, जसप्रीत बुमराह, कायरन पोलार्ड, सूर्यकुमार यादव, इशान किशन हे मुंबई इंडियन्सचे स्टार खेळाडू या गाण्यात सहभागी झाले आहेत. त्याचबरोबर मुंबई इंडियन्सच्या मालकीण नीता अंबानी (Nita Ambani) यांचाही यामध्ये विशेष सहभाग असून त्यांनी मराठी भाषेत मुंबईच्या फॅन्सशी संवाद साधला आहे. 'मुंबई इंडियन्स,  महाराष्ट्राच्या प्रत्येक फॅमिलीचा अभिमान, चला पलटन, आयपीएल 2021  मध्ये होऊ द्या आपलाच आवाज' असं कॅप्शन या गाण्याला देण्यात आले असून ते सोशल मीडियावर चांगलंच व्हायरल (Song Viral) होत आहे.  ड्वेन ब्राव्होच्या टीमने विजेतेपदाचा संपवला दुष्काळ; अखेरच्या बॉलवर सेंट किट्सचा रोमांचक विजय मुंबई इंडियन्सची पहिली लढत 19 सप्टेंबर रोजी चेन्नई सुपर किंग्सशी (Mumbai Indians vs Chennai Super Kings) होणार आहे. मुंबईनं पहिल्या टप्प्यात 7 पैकी 4 सामने जिंकले असून 8 पॉईंट्ससह मुंबईची टीम पॉईंट टेबलमध्ये चौथ्या क्रमांकावर आहे. मुंबई इंडियन्सची टीम : रोहित शर्मा, अ‍ॅडम मिल्ने, आदित्य तरे, अनमोलप्रीत सिंग, अनुकुल रॉय, अर्जुन तेंडुलकर, ख्रिस लीन, धवल कुलकर्णी, हार्दिक पांड्या, इशान किशन, जिमी निशम, जसप्रीत बुमराह, जयंत यादव, कायरन पोलार्ड, कृणाल पांड्या, मार्को जासेन, मोहसीन खान, नॅथन कुल्टर नाईल, पियूष चावला, क्विंटन डी कॉक, राहुल चहर, सौरभ तिवारी, सूर्यकुमार यादव, ट्रेंट बोल्ट आणि युधवीर सिंह मुंबईच्या सामन्यांचं वेळापत्रक 19 सप्टेंबर- मुंबई विरुद्ध चेन्नई- संध्याकाळी 7.30 वाजता, दुबई 26 सप्टेंबर- मुंबई विरुद्ध बँगलोर- संध्याकाळी 7.30 वाजता, दुबई 28 सप्टेंबर- मुंबई विरुद्ध पंजाब- संध्याकाळी 7.30 वाजता, अबु धाबी 2 ऑक्टोबर- मुंबई विरुद्ध दिल्ली- दुपारी 3.30 वाजता 5 ऑक्टोबर- मुंबई विरुद्ध राजस्थान- संध्याकाळी 7.30 वाजता 8 ऑक्टोबर- मुंबई विरुद्ध हैदराबाद- दुपारी 3.30 वाजता, अबु धाबी
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Cricket news, IPL 2021, Mumbai Indians

    पुढील बातम्या