मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

IPL 2021: विदेशी खेळाडूंच्या मदतीसाठी धावली Mumbai Indians! मायदेशी पाठवण्यासाठी करणार खास उपाय

IPL 2021: विदेशी खेळाडूंच्या मदतीसाठी धावली Mumbai Indians! मायदेशी पाठवण्यासाठी करणार खास उपाय

कोरोना व्हायरसच्या (Coronavirus) उद्रेकामुळे आयपीएल 2021 (IPL 2021) ही स्पर्धा बीसीसीआयनं स्थगित केली. या निर्णयाला 40 तास उलटल्यानंतरही अनेक विदेशी खेळाडू भारतामध्येच आहेत.

  • Published by:  News18 Desk

मुंबई, 6 मे : कोरोना व्हायरसच्या (Coronavirus) उद्रेकामुळे आयपीएल 2021 (IPL 2021) ही स्पर्धा बीसीसीआयनं स्थगित केली. या निर्णयाला 40 तास उलटल्यानंतरही अनेक विदेशी खेळाडू भारतामध्येच आहेत. बीसीसीआय आणि आयपीएल फ्रँचायझी त्यांना घरी पाठवण्यासाठी प्रयत्न करत आहे. बीसीसीआयची ही डोकेदुखी कमी करण्यासाठी मुंबई इंडियन्सनं (Mumbai Indians) पुढाकार घेतला आहे. विदेशी खेळाडूंना घरी पाठवण्यासाठी मुंबई इंडियन्स चार्टर्ड विमानाची व्यवस्था करणार आहे. या विमानातून मुंबईसह सर्वच आयपीएल टीमच्या विदेशी खेळाडूंना मायदेशी जाता येईल.

या चार्टर्ड विमानातून दक्षिण आफ्रिका, न्यूझीलंड आणि वेस्ट इंडिज या देशातील खेळाडूंना मायदेशी पाठवले जाऊ शकते. वेस्ट इंडिजच्या खेळाडूंना व्हाया जोहन्सबर्ग नेण्यात येईल. जोहन्सबर्गमध्ये दक्षिण आफ्रिकेच्या खेळाडूंना सोडल्यानंतर ते चार्टर्ड विमान वेस्ट इंडिजला रवाना होईल. येत्या 24 ते 48 तासांमध्ये हे सर्व खेळाडू रवाना होतील. आयपीएलच्या बायो-बबलमध्ये खेळाडू आणि सपोर्ट स्टाफला कोरोनाची लागण झाल्यानं ही स्पर्धा स्थगित करण्यात आली. आयपीएलमधील 60 पैकी 29 सामने झाले आहेत. आता उर्वरित 31 सामने कधी खेळवायचे? हा प्रश्न बीसीसीआयसमोर आहे.

कोणते विदेशी खेळाडू घरी परतले?

आयपीएलमध्ये भाग घेतलेल्या इंग्लंडच्या 11 खेळाडूंपैकी 8 खेळाडू बुधवारी मायदेशात परतले. यामध्ये जॉस बटलर आणि जॉनी बेयरस्टो यांचा समावेश आहे. स्काय स्पोर्ट्सने दिलेल्या वृत्तानुसार बटलर, बेयरस्टो, सॅम करन, टॉम करन, सॅम बिलिंग्स, क्रिस वोक्स, मोईन अली आणि जेसन रॉय ब्रिटनमध्ये दाखल झाले आहेत. ब्रिटनने कोरोना महामारीमुळे भारताला रेड लिस्टमध्ये टाकलं आहे, त्यामुळे खेळाडूंना इंग्लंडला परतल्यानंतर 10 दिवस सरकारने सांगितलेल्या ठिकाणी क्वारंटाईन व्हावं लागणार आहे.

IPL 2021: कोरोना संक्रमित क्रिकेटपटूला मिळाल्या सर्वात गोड शुभेच्छा!

बीसीसीआयनं सगळ्या परदेशी खेळाडूंना सुरक्षित घरी पोहोचवण्याची हमी दिली आहे. ऑस्ट्रेलियाने भारतातून येणाऱ्यांवर 15 मेपर्यंत बंदी घातली आहे, त्यामुळे ऑस्ट्रेलियाचे खेळाडू मालदीव किंवा श्रीलंकेमध्ये थांबण्याची शक्यता आहे.

First published:

Tags: IPL 2021, Mumbai Indians