मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /IPL 2021: कोरोना संक्रमित क्रिकेटपटूला मिळाल्या सर्वात गोड शुभेच्छा!

IPL 2021: कोरोना संक्रमित क्रिकेटपटूला मिळाल्या सर्वात गोड शुभेच्छा!

टीम इंडियाचा (Team India) विकेट किपर- बॅट्समन वृद्धीमान साहा (Wriddhiman Saha) याला कोरनाची लागण झाली आहे. साहा आयपीएलच्या सुरक्षित बायो-बबलमध्ये कोरोना संक्रमित झाला होता.

अहमदाबाद, 7 मे : टीम इंडियाचा (Team India) विकेट किपर- बॅट्समन वृद्धीमान साहा (Wriddhiman Saha) याला कोरनाची लागण झाली आहे. सनरायझर्स हैदराबाद (SRH) टीमचा सदस्य असलेला साहा आयपीएलच्या सुरक्षित बायो-बबलमध्ये कोरोना संक्रमित झाला होता. त्याला कोरोनाची लागण झाल्याची माहिती 4 मे रोजी समोर आली. त्यानंतर काही वेळातच भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्डानं (BCCI) आयपीएल स्पर्धा (IPL 2021) अनिश्चित काळासाठी स्थगित करण्याचा निर्णय घेतला.

साहा सध्या आयपीएलनं निश्चित केलेल्या मेडिकल आयसोलेशनमध्ये आहे. तो लवकर बरा व्हावा यासाठी जगभरातले क्रिकेट फॅन्स प्रार्थना करत आहेत. त्याचवेळी त्याला सर्वात गोड शुभेच्छा या त्याची मुलगी मिया (Mia) कडून मिळाल्या आहेत. साहानं ट्विटरवर मुलीचा तो मेसेज शेअर केलाय.

साहानं त्याची मुलगी मियानं हातानं काढलेलं एक चित्र शेअर केलंय. त्याचा चित्रामध्ये सुपरमॅन कोरोना व्हायरसशी लढत आहे. 'बाबा लवकर बरे व्हा' असा मेसेज त्या चित्रावर आहे. साहानं ते चित्र शेअर करत म्हंटलं आहे की, सध्या हेच माझ्यासाठी जग आहे. मियानं तिच्या शुभेच्छा पाठवल्या आहेत. तुमच्या सर्वांच्या प्रार्थना आणि शुभेच्छांसाठी आभारी आहे."

( वाचा : कोरोना संकटात पठाण बंधू पुढे आले, गरजूंना अशी करणार मदत )

साहाला या आयपीएलमध्ये फक्त 2 मॅच खेळण्याचीच संधी मिळाली. त्यामध्ये चांगली कामगिरी करण्यात अपयश आल्यानं त्याला प्लेईंग 11 मधून वगळण्यात आलं होतं. आयपीएलच्या बायो-बबलमध्ये कोरोनाचं संक्रमण झालेल्या चार क्रिकेटपटूंपैकी तो एक आहे. वृद्धीमान साहासह कोलकाता नाईट रायडर्सचे वरुण चक्रवर्ती आणि संदीप वॉरियर, दिल्ली कॅपिटल्सचा अमित मिश्रा यांना कोरोनाची लागण झाली आहे.

First published:

Tags: Coronavirus, Cricket, IPL 2021, Sunrisers hyderabad