• Home
 • »
 • News
 • »
 • sport
 • »
 • IPL 2021 : धोनीनं सांगितली रोहितची खास गोष्ट! Viral Look चे रहस्य उघड; पाहा VIDEO

IPL 2021 : धोनीनं सांगितली रोहितची खास गोष्ट! Viral Look चे रहस्य उघड; पाहा VIDEO

टीम इंडियाचा माजी कॅप्टन महेंद्रसिंह धोनी (MS Dhoni) हा बौद्ध भिख्खूच्या कपड्यामध्ये बसलेला फोटो नुकताच व्हायरल (Viral) झाला होता. हा फोटो कशाचा आहे याचं रहस्य उघड झालं आहे.

 • Share this:
  मुंबई, 15 मार्च : टीम इंडियाचा माजी कॅप्टन महेंद्रसिंह धोनी (MS Dhoni) हा बौद्ध भिख्खूच्या कपड्यामध्ये बसलेला फोटो नुकताच व्हायरल (Viral) झाला होता. धोनीचा हा नवा अवतार कशासाठी आहे याची जोरदार चर्चा सोशल मीडियावर रंगली होती. त्यावर अनेक चर्चा सुरू होत्या. अखेर या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. आयपीएल स्पर्धांचं अधिकृत ब्रॉडकास्टर असलेल्या स्टार स्पोर्ट्सने (Star Sports) एक नवी जाहिरात प्रदर्शित केली असून यामध्ये धोनी फोटोतील लुकमध्ये दिसत आहे. काय आहे जाहिरात? एका मार्शल आर्ट प्रशिक्षण केंद्रातील मुलं क्रिकेट खेळत असल्याच्या दृश्याने या जाहिरातीची सुरुवात होते. बॅटींग करणारा मुलगा सिक्स मारल्यानंतर आणखी एक बॉल टाकण्याची सूचना बॉलरला करतो. त्याचवेळी धोनी बौद्ध भिख्खूच्या अवतारामध्ये तिथं येतो, आणि त्या मुलांना हिटमॅन रोहित शर्माची गोष्ट सांगण्यास सुरुवात करतो. 'हिटमॅन (Hitman) म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रोहित शर्माने (Rohit Sharma) आयपीएल स्पर्धेचे विजेतेपद पहिल्यांदा पटकावलं. त्यानंतर वाघाच्या तोंडाला रक्त लागलं, आणि त्याने पाच वेळा स्पर्धेचं विजेतेपद मिळवलं. या विजेतेपदानंतरही त्याची भूक संपलेली नाही.  बाहेरच्या जगात हाव ही वाईट गोष्ट आहे. पण आयपीएल स्पर्धेमध्ये यामुळे विजयाची भूक वाढत असेल, तर हाव ही कुल गोष्ट आहे (To laalach is cool)' असं धोनी या जाहिरातीमध्ये विद्यार्थ्यांना समजावून सांगत आहे. महेंद्रसिंह धोनीने मागच्या वर्षी 15 ऑगस्ट रोजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. त्यानंतर झालेल्या आयपीएल स्पर्धेत (IPL 2020) धोनीच्या चेन्नई सुपर किंग्स टीमची निराशाजनक कामगिरी झाली होती. स्पर्धेच्या इतिहासात पहिल्यांदाच चेन्नईला 'प्ले ऑफ' मध्ये प्रवेश मिळाला नव्हता. ( IND vs ENG : सूर्यकुमारनं कॅच सोडला अन् बदलले विराटचे हावभाव; पाहा VIDEO ) चेन्नईने मागील अपयश विसरण्यासाठी जोरदार कंबर कसली आहे. त्यांनी खेळाडूंचा ट्रेनिंग कॅम्प सुरू केला आहे. या ट्रेनिंग कॅम्पमध्ये धोनी देखील सहभागी झाला आहे. धोनीच्या फटकेबाजीचा एक व्हिडीओ चेन्नई सुपर किंग्सने नुकताच शेअर केला होता.
  Published by:News18 Desk
  First published: