अहमदाबाद, 15 मार्च : इंग्लंडविरुद्ध रविवारी झालेली दुसरी टी20 मॅच सूर्यकुमार यादवसाठी (Suryakumar Yadav) खास होती. देशांतर्गत क्रिकेट आणि आयपीएलमध्ये सातत्याने चांगला खेळ केल्यानंतर त्याची प्रतीक्षा अखेर फळाला आली. मुंबईच्या या बॅट्समनला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करण्याची संधी मिळाली. सूर्यकुमारसाठी पहिली आंतरराष्ट्रीय मॅच संमिश्र ठरली. त्याला या मॅचमध्ये बॅटींगची संधी मिळाली नाही. पण फिल्डिंग करताना त्याच्या हातून एक कॅच सुटला. ते पाहून विराट कोहलीच्या (Virat Kohli) चेहऱ्यावरील हावभाव क्षणात बदलले. या घटनेचा व्हिडीओ आता चांगलाच व्हायरल झाला आहे. नेमकं काय झालं? इंग्लंडच्या इनिंगमधील 14 व्या ओव्हरमध्ये हा प्रकार घडला. वॉशिंग्टन सुंदरच्या ओव्हरमधील दुसऱ्या बॉलवर जॉनी बेअरस्टोने डीप मिडविकेटला एक जोरदार फटका मारला. बेअरस्टोने मारलेला बॉल हवेत होता त्यावेळी सूर्यकुमार यादव त्याच्या खाली आला. सूर्यकुमारने तो कॅच पकडण्याचा प्रयत्न केला, पण त्याला कॅचचा योग्य अंदाज आला नाही. बॉल त्याच्या हाताला लागून बाऊंड्री लाईनच्या बाहेर गेला. बेअरस्टोला त्या बॉलवर सहा रन मिळाले. सूर्यकुमारने ही कॅच सोडताच विराट कोहलीला त्याची निराशा लपवता आली नाही. त्याचे चेहऱ्यावरचे भाव क्षणात बदलले. विराटचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. pic.twitter.com/fSLArJ5uiD — pakas2009@gmail.com (@pakas2009) March 14, 2021 सूर्यानेच केली भरपाई सूर्यकुमार यादवने दिलेलं हे जीवदान भारताला फार महाग पडले नाही. सुंदरच्या त्याच ओव्हरमध्ये तीन बॉलनंतर सूर्यकुमारनेच बेअरस्टोचा कॅच घेतला. त्यावेळी देखील तो कॅच जवळपास सुटला होता, सूर्याने तो शेवटच्या क्षणी पकडत धोकादायक बेअरस्टोला परत पाठवले आणि आपल्या चुकीची भरपाई देखील केली. ( वाचा : ‘मॅचपूर्वी ‘या’ खेळाडूनं दिलेला सल्ला कामी आला’, विराटने केला खुलासा ) अहमबादाबादमध्ये झालेली दुसरी टी20 मॅच टीम इंडियाने 7 विकेट्सनं जिंकली आहे. या विजयाबरोबरच पाच मॅचच्या या मालिकेत भारताने 1-1 अशी बरोबरी केली आहे. आता पुढील मॅच 16 तारखेला होणार आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.