दुबई, 25 ऑगस्ट: आयपीएल 2021 च्या दुसऱ्या टप्प्यासाठी (IPL 2021 2nd Phase) महेंद्रसिंह धोनीची (MS Dhoni) चेन्नई सुपर किंग्स Chennai Super kings) यूएईमध्ये दाखल झाली आहे. या टीमचा सध्या जोरदार सराव सुरु आहे. कॅप्टन महेंद्रसिंह धोनीही नेट सेशनमध्ये चांगलाच घाम गाळतोय. धोनीनं नेट सेशनमध्ये काही मोठे सिक्स देखील लगावले. त्यापैकीच एका सिक्सचा व्हिडीओ चेन्नईनं त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये धोनी सिक्स लगावताना दिसत आहे. यापैकी एक सिक्स तर इतका मोठा होता की त्यानं मारलेला बॉल थेट मैदानाच्या बाहेर गेला. धोनीनं मारलेला हा बॉल शोधण्यासाठी सीएसकेची सर्व टीम कामाला लागली. स्वत: धोनी देखील या शोधमोहिमेत सहभागी झाला होता.धोनी मैदानाच्या बाहेर असलेल्या झाडीत जाऊन हा बॉल शोधत होता. धोनीचा हा व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल (Video Viral) झाला असून अनेकांना तो पाहून लहानपणीची आठवण झाली आहे.
Dhoni's Sixes 🤝🏻 Our love for Thala
— Chennai Super Kings (@ChennaiIPL) August 24, 2021
Out of bounds#WhistlePodu #Yellove 🦁💛 @msdhoni pic.twitter.com/PA8smfxuw5
आयपीएल स्पर्धा कोरोना व्हायरसमुळे स्थगित होण्यापूर्वी सीएसकेनं 7 पैकी 5 मॅच जिंकल्या असून पॉईंट टेबलमध्ये त्यांची टीम सध्या दुसऱ्या क्रमांकावर आहे. पण पहिल्या टप्प्यात धोनीची बॅट शांत होती. त्यानं 7 मॅचमध्ये फक्त 37 रन काढले आहेत. आता याची भरपाई करण्याचा धोनीचा प्रयत्न आहे. IND vs ENG: टीम इंडियावर पलटवार करण्यासाठी इंग्लंड करणार 2 बदल, पाहा Playing XI आयपीएल स्पर्धेचा दुसरा टप्पा 19 सप्टेंबरपासून सुरु होणार आहे. चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध मुंबई इंडियन्स (CSK vs MI) या मॅचनं याची सुरुवात होईल. या सिझनची फायनल 15 ऑक्टोबर रोजी होणार आहे.