हेडिंग्ले, 25 ऑगस्ट: जो रूटच्या (Joe Root) कॅप्टनसीमध्ये यजमान इंग्लंड टीम इंडियावर पलटवार करण्याच्या निर्धारानं तिसऱ्या टेस्टमध्ये उतरणार आहे. या सीरिजमध्ये इंग्लंडची टॉप ऑर्डर फेल गेली आहे. त्याचबरोबर टीमला फास्ट बॉलर्सची कमतरता भासत आहे. ही सीरिज सुरू होण्यापूर्वीच जोफ्रा आर्चर, ख्रिस वोक्स आणि बेन स्टोक्स आऊट झाले होते. तर पहिल्या टेस्टमध्ये स्टुअर्ट ब्रॉड आणि दुसऱ्या टेस्टमध्ये टीम वूड जखमी झाला आहे. त्यामुळे इंग्लंडच्या टीममध्ये दोन बदल नक्की आहेत.
या टेस्टमध्ये ओपनिंग बॅट्समन डॉम सिब्लेच्या जागी डेव्हिड मलान (Dawid Malan) तर मार्क वू़डच्या जागी साकिब महमूदचा (Saqib Mahmood) समावेश नक्की मानला जात आहे. मलानच्या समावेशावं इंग्लंडची बॅटींग मजबूत होणार आहे. मलाननं यापूर्वीची टेस्ट तीन वर्षांपूर्वी खेळली असली तरी तो सध्या चांगल्या फॉर्मात आहे. तो या टेस्टमध्ये तीन नंबरवर उतरेल, त्यामुळे हसीब अहमद आणि रोरी बर्न्स ही जोडी ओपनिंग करेल. या सीरिजमध्ये इंग्लंडकडून फक्त जो रूटनं सातत्यानं रन केले आहेत.
टीम इंडियाच्या बॅट्समनना बाऊन्सरनं त्रस्त करणारा मार्क वूड जखमी झालाय. त्याच्या जागेवर साकिब महमूद पदार्पण करेल. साकिब इंग्लंडकडून 7 वनडे आणि 9 टी-20 मॅच खेळला आहे. त्यामध्ये त्यानं अनुक्रमे 14 आणि 7 विकेट्स घेतल्या आहेत. पाकिस्तान विरुद्ध नुकत्याच झालेल्या वन-डे सीरिजमध्ये त्यानं 9 विकेट्स घेतल्या होत्या. इंग्लंडनं ती सीरिज 3-0 नं जिंकली. त्यामध्ये साकिबला 'मॅन ऑफ द सीरिज'चा पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं होतं. त्याचबरोबर त्यानं 56 फर्स्ट क्लास मॅचमध्ये 129 विकेट्स घेतल्या आहेत.
IND vs ENG: तिसरी टेस्ट आजपासून, लीड्समध्ये असं असणार 5 दिवस हवामान
इंग्लंडची संभाव्य टीम: रोरी बर्न्स, हसीब अहमद, डेव्हिड मलान, जो रूट (कॅप्टन), जॉनी बेअरस्टो, जोस बटलर, मोईन अली, सॅम करन, ओली रॉबिन्सन, साकिब महमूद आणि जेम्स अँडरसन
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.