Home /News /sport /

IPL 2021: मोईन अलीला CSK देणार वेगळी जर्सी, जाणून घ्या काय आहे कारण?

IPL 2021: मोईन अलीला CSK देणार वेगळी जर्सी, जाणून घ्या काय आहे कारण?

इंग्लंडचा ऑल राऊंडर मोईन अली (Moeen Ali) यंदा चेन्नई सुपर किंग्स (CSK) टीमकडून खेळणार आहे. या टीमची जर्सी घालण्यापूर्वी मोईननं सीएसकेकडं एक खास मागणी केली होती. सीएसकेनं ती मागणी मान्य केली आहे.

    चेन्नई, 4 एप्रिल : इंग्लंडचा ऑल राऊंडर मोईन अली (Moeen Ali) यंदा चेन्नई सुपर किंग्स (CSK) टीमकडून खेळणार आहे. या टीमची जर्सी घालण्यापूर्वी मोईननं सीएसकेकडं एक खास मागणी केली होती. सीएसकेनं ती मागणी मान्य करत मोईनला वेगळी जर्सी (New Jersey) देण्याचा निर्णय घेतला आहे. मोईनच्या विनंतीवरुन त्याला अल्कोहल ब्रँडचा (Alcohol brand) लोगो काढून टाकणार आहे. मोईननं का केली मागणी? मोईन अली हा धर्मानं मुस्लीम आहे. तो धार्मिक नियमांचं पालन करत कधीही अल्कोहलच्या ब्रँडचं प्रमोशन करत नाही. इंग्लंडकडून खेळतानाही तो आणि आदिल रशिद अल्कोहलपासून आणि त्या ब्रँडचं प्रमोशन करणे टाळतात. सीएसकेच्या जर्सीवर एसएनजे 10000 चा लोगो आहे. जो एक अल्कोहल ब्रँड आहे. मोईननं टीम मॅनेजमेंटकडं जर्सीवरुन हा लोगो हटवण्याची मागणी केली होती. ती मॅनेजमेंटनं मान्य केली आहे. मोईन अलीसाठी मोजली मोठी किंमत गेल्या वर्षीचं अपयश विसरुन नव्या जोमानं चेन्नई सुपर किंग्स (CSK) यावर्षीच्या आयपीएलमध्ये उतरलं आहे. मोईन अलीला करारबद्ध करण्यासाठी सीएसकेची  पंजाब किंग्ज सोबत जोरदार स्पर्धा रंगली होती. अखेर धोनीच्या टीमनं मोईन अलीला 7 कोटींना खरेदी केलं. विशेष म्हणजे सीएसकेनं त्यांच्याकडं शिल्लक असलेल्या एकमेव विदेशी खेळाडूच्या जागेसाठी मोईन अलीला खरेदी करावी असा सल्ला भारताचा माजी ओपनर गौतम गंभीरनं दिला होता. ( वाचा : टीम इंडियाची भिंत असलेल्या चेतेश्वर पुजाराला या कारणामुळे होती IPL ची भीती! ) " सीएसकेकडं सध्या इम्रान ताहीर आणि कर्ण शर्मा हे दोन लेगस्पिनर आहेत. त्याचबरोबर त्यांच्याकडं डाव्या हातानं बॉलिंग आणि चांगली बॅटींग करु शकेल असा स्पिनर (मिचेल स्टॅनर) देखील आहे. आता टीमला एका ऑफ स्पिनरची आवश्यकता आहे. जो प्रतिस्पर्धी टीमच्या उजव्या हाताच्या फलंदाजांच्या विरुद्ध उपयुक्त ठरेल. धोनीच्या टीममध्ये नेहमीच ऑफ स्पिनरला खास स्थान राहिले आहे. यापूर्वी आर. अश्विन आणि हरभजन सिंग होते. आता त्यांना नव्या बॉलनं बॉलिंग करु शकणाऱ्या स्पिनरची गरज आहे. मोईन अलीमध्ये ही क्षमता आहे, ’’ असं गंभीरनं सांगितलं होतं.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Cricket, Csk, IPL 2021

    पुढील बातम्या