मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

टीम इंडियाची भिंत असलेल्या चेतेश्वर पुजाराला या कारणामुळे होती IPL ची भीती!

टीम इंडियाची भिंत असलेल्या चेतेश्वर पुजाराला या कारणामुळे होती IPL ची भीती!

 टीम इंडियाची भिंत असलेला चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujara)  तब्बल सात वर्षानंतर आयपीएलमध्ये (IPL 2021) पुनरागमन करत आहे. आपल्याला यापूर्वी एका कारणामुळे आयपीएलची भीती वाटत होती, असा खुलासा पुजारानं केला आहे.

  • Published by:  News18 Desk

मुंबई, 4 एप्रिल : टीम इंडियाची भिंत असलेला चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujara)  तब्बल सात वर्षानंतर आयपीएलमध्ये (IPL 2021) पुनरागमन करत आहे. त्याला यावर्षी झालेल्या लिलावात चेन्नई सुपर किंग्सनं (Chennai Super Kings) खरेदी केले. चेन्नईनं पुजारासाठी बोली लावताच आयपीएल ऑक्शन (IPL Auction 2021) रुममध्ये सर्वांनी टाळ्यांच्या गजरात स्वागत केले होते. टेस्ट क्रिकेट स्पेशालिस्ट असलेल्या पुजाराची आयपीएल टीममध्ये निवड होणं ही मोठी असमान्य गोष्ट असल्याचं अनेकांचं मत आहे.

पुजारा यापूर्वी तीन आयपीएल टीमकडून खेळला आहे. त्याचबरोबर त्याने सौराष्ट्रकडून 2019 साली झालेल्या सय्यद मुश्ताक अली टी20 स्पर्धेत शतक देखील झळकावले आहे. त्यामुळे या आयपीएल सिझनमध्ये चांगली कामगिरी करण्याचा पुजाराला विश्वास आहे. 'ईएसपीएन क्रिकइन्फो' या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीमध्ये पुजारानं आयपीएलसाठी झालेली निवड, महेंद्र सिंह धोनीच्या कॅप्टनसीमध्ये खेळण्याची संधी यासह अनेक विषयांवर त्याचं मत मांडलं आहे.

पुजारानं या मुलाखतीमध्ये त्याच्या बॅटींगबद्दलही सांगितलं. टी 20 क्रिकेट खेळताना बॅटिंगच्या तंत्रात बदल केला तर त्याचा फटका टेस्ट क्रिकेटमध्ये बसेल अशी भीती ऐकेकाळी मला वाटत होती, असं पुजारानं सांगितलं. आता पुजाराला तशी भीतीा वाटत नाही. त्या गोष्टीचा आता अजिबात विचार करत नसल्याचं त्यानं सांगितलं.

'यापूर्वी टी20 क्रिकेट खेळताना यामुळे माझं टेस्ट क्रिकेट प्रभावित होईल का? याचा विचार मी करत होतो. आयपीएल संपल्यानंतर माझं बॅटींगचं तंत्र कमकुवत होईल असं मला वाटत होतं. पण आता आजवर मिळालेल्या अनुभवानंतर  माझा नैसर्गिक खेळ आणि माझी बलस्थानं कमी होणार नाहीत हे मला समजलं आहे, असं पुजारानं सांगितलं.

( वाचा : IPL 2021 : CSK नं चेतेश्वर पुजाराला विचारला मजेशीर प्रश्न, Tweet होत आहे Viral )

पुजाराचं आयपीएल रेकॉर्ड

चेतेश्वर पुजाराचं आयपीएल रेकॉर्ड फारसं चांगलं नाही. त्याने 30 मॅचमध्ये 20.52 च्या सरासरीने 390 रन केले, यात त्याचा स्ट्राईक रेट 100 पेक्षाही कमी आहे. आयपीएलमध्ये त्याला फक्त एक अर्धशतक करता आलं आहे. तर टी-20 क्रिकेटमध्ये पुजाराने एक शतकही केलं आहे. 56 टी-20 इनिंगमध्ये त्याने 1,356 रन केल्या आहेत.

First published:

Tags: Cricket, Csk, IPL 2021, Pujara