मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

IPL 2021 Live Streaming: एकाच वेळी होणार 2 मॅच, MI vs SRH आणि RCB vs DC चा मुकाबला इथे पाहता येणार

IPL 2021 Live Streaming: एकाच वेळी होणार 2 मॅच, MI vs SRH आणि RCB vs DC चा मुकाबला इथे पाहता येणार

आयपीएल स्पर्धेच्या (IPL 2021) आजवरच्या इतिहासात 8 ऑक्टोबर हा दिवस खास आहे. या दिवशी पहिल्यांदाच 2 मॅच एकाच वेळी होणार आहेत.

आयपीएल स्पर्धेच्या (IPL 2021) आजवरच्या इतिहासात 8 ऑक्टोबर हा दिवस खास आहे. या दिवशी पहिल्यांदाच 2 मॅच एकाच वेळी होणार आहेत.

आयपीएल स्पर्धेच्या (IPL 2021) आजवरच्या इतिहासात 8 ऑक्टोबर हा दिवस खास आहे. या दिवशी पहिल्यांदाच 2 मॅच एकाच वेळी होणार आहेत.

  • Published by:  News18 Desk

मुंबई, 8 ऑक्टोबर : आयपीएल स्पर्धेच्या आजवरच्या इतिहासात 8 ऑक्टोबर हा दिवस खास आहे. या दिवशी पहिल्यांदाच 2 मॅच एकाच वेळी होणार आहेत. आयपीएल 2021 (IPL 2021) च्या लीग मॅचेसचा हा शेवटचा दिवस आहे. या दिवशी मुंबई इंडियन्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद (Mumbai Indians vs Sunrisers Hyderabad) आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स (Royal Challengers Bangalore vs Delhi Capitals) या दोन लढती एकाचवेळी होत आहेत. त्यामुळे 4 टीम एकाचवेळी मैदानात असतील.

मुंबई इंडियन्सला (MI) प्ले ऑफमध्ये प्रवेश करण्यासाठी त्यांना सनरायझर्स हैदराबादचा किमान 171 रननं पराभव करणे आवश्यक आहे. त्यामुळे मुंबई इंडियन्सचा प्ले ऑफमधील प्रवेश अवघड मानला जात आहे. मुंबई इंडियन्सची पहिल्यांदा बॉलिंग आली तर रोहित शर्माची (Rohit Sharma) टीम केकेआरला मागं टाकू शकत नाही. मुंबईनं अगदी पहिल्या ओव्हरमध्ये विजय मिळवला तरी ते शक्य होणार नाही.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) आणि दिल्ली कॅपिटल्स (DC) या दोन्ही टीमचा प्ले ऑफमधील प्रवेश निश्चित झाला आहे. यापैकी दिल्लीची टीम पहिल्या क्रमांकावर राहणार हे नक्की आहे. आरसीबीला टॉप 2 मध्ये प्रवेश करण्यासाठी दिल्लीवर मोठा विजय मिळवणे आवश्यक आहे. 'प्ले ऑफ'पूर्वी होणाऱ्या मॅचमध्ये दोन्ही टीम संपूर्ण क्षमतेनं खेळणार की काही खेळाडूंना विश्रांती देणार? याची उत्सुकता आहे.

IPL 2021 Playoffs: ....तर हैदराबाद विरुद्ध एकही बॉल न खेळता मुंबई इंडियन्स होणार आऊट!

कुठे होणार मॅच?

आयपीएलमधील 55 वी मॅच मुंबई इंडियन्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद  (MI vs SRH) यांच्यात होणार आहे. ही मॅच अबु धाबीमधील शेख झायद स्टेडियमवर होणार आहे. भारतीय वेळेनुसार हा सामना संध्याकाळी 7.30 वाजता सुरू होणार आहे. तर टॉस 7 वाजता होईल.

IPL 2021: आयपीएल स्पर्धेनंतर टीम इंडियाचा दिग्गज खेळाडू होणार निवृत्त!

आयपीएलमधील 56 वी मॅच रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स (RCB vs DC) यांच्यात होणार आहे. ही मॅच दुबई इंटरनॅशनल स्टेडियममध्ये होणार आहे. भारतीय वेळेनुसार हा सामना संध्याकाळी 7.30 वाजता सुरू होणार आहे. तर टॉस 7 वाजता होईल.

कुठे पाहता येईल मॅच?

मुंबई इंडियन्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद ही लढत स्टार स्पोर्ट्स 2 (SD आणि HD) स्टार स्पोर्ट्स 3 आणि स्टार गोल्ड सिलेक्ट (SD आणि HD) इथं पाहता येईल. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स ही लढत स्टार स्पोर्ट्स 1 (एसडी आणि एचडी) वर पाहता येणार आहे.

लाईव्ह स्ट्रीमिंग कुठे पाहता येणार?

आयपीएल 2021 च्या मॅचचं लाईव्ह स्ट्रीमिंग हॉटस्टारवरही पाहता येणार आहे.

जिओवरही पाहता येणार मॅच

रिलायन्स जिओदेखील आपल्या ग्राहकांना आयपीएल मॅचची सुविधा देणार आहे. पोस्ट-पेड आणि प्री-पेड ग्राहकांना ही सुविधा मिळेल. जियोचे सगळे पोस्ट पेड ग्राहक आयपीएल मॅच फ्रीमध्ये पाहू शकतील. जिओ टीव्हीवर प्रेक्षकांना आयपीएल सामने पाहता येतील.

First published: